झारखंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्या कार्यालयांवर आणि घरावर ईडीने छापा मारला आहे. पूजा सिंघल यांच्या १८ ठिकाणांवर ईडीने छापे टाकले आहे. या छाप्यांमध्ये कोट्यवधींची रोकड सापडली असून अधिकाऱ्यांनी ती जप्त केली आहे. (pooja singhal ed raid)
रांची येथील चार्टर्ड अकाउंटंटच्या कार्यालयात टाकलेल्या छाप्यात २५ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. यासोबतच अनेक महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत. हा चार्टर्ड अकाउंटंट आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्या जवळचा असल्याचे बोलले जाते.
आज ईडीने झारखंडमध्ये छापा टाकला. खाण आणि उद्योग सचिव पूजा सिंघल यांच्या निवासस्थानासह इतर ठिकाणीही छापे टाकण्यात आले. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सकाळी ७ वाजण्याआधीच छापे टाकण्यास सुरुवात केली होती. रांचीमधील पंचवटी रेसिडेन्सी बी ब्लॉक ९०४ मध्येही अंमलबजावणी संचालनालयाने छापा टाकला.
पल्स हॉस्पिटलशी संबंधित लोकांच्या जागेवरही ईडीचे छापे टाकण्यात येत आहेत. पल्स हॉस्पिटल हे पूजा सिंघल यांचे पती अभिषेक झा यांचे आहे. याशिवाय रांचीमध्येच हरी ओम टॉवरच्या नव्या इमारतीत ईडीने छापा टाकल्याची बातमी आहे. ईडीच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरण आणि खाण लीज प्रकरणासह खुंटी येथील मनरेगामध्ये १८ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी हे छापे टाकण्यात आले.
हा आर्थिक घोटाळा उघडकीस आल्यानंतर राम विनोद सिन्हा नावाच्या सेक्शन ऑफिसरला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीत काही पोलिस अधिकाऱ्यांची नावे समोर आली, त्यात पूजा सिंघलचे नाव पुढे आले. त्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. या छाप्यात पूजा सिंघलच्या दिल्लीतील चार्टर्ड अकाऊंटच्या कार्यालयात तब्बल २५ कोटींची रोकड सापडली आहे.
बँकेच्या कर्मचाऱ्यांना रुपये मोजण्यासाठी बोलावण्यात आले आहे. नोटा मोजणी मशिनद्वारे मोजणीचे काम सुरू करण्यात आले. अधिकारी अजूनही पूजा सिंघल यांची चौकशी करत आहे. तसेच ते छापे टाकण्यात आलेल्या ठिकाणी उपस्थित असून इतर गोष्टींचीही तपासणी करत आहे.
महत्वाच्या बातम्या-
वडिलांवर लावलेल्या आरोपांनंतर संतापला शत्रुघ्न सिन्हांचा मुलगा; म्हणाला, अशा फालतू गोष्टींवर…
राज ठाकरेंना धमकी का दिली? युपीतील भाजपा खासदाराने स्पष्टच सांगितलं; “शिवाजी महाराजांच्या…
नवी मुंबईत आगीचे तांडव! तब्बल नऊ कंपन्या जळून खाक