पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चर्चेत आलेले शिवसेना आमदार संजय राठोड हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मागील वर्षी संजय राठोड हे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चांगलेच अडकले होते. त्या प्रकरणावरून राजकारण देखील चांगलच रंगल होतं. भाजपने त्यांच्यावर सडकून टिका देखील केली होती.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांचं प्रकरण चांगलच लावून धरलं होतं. भाजपने अनेक आंदोलन देखील त्यांच्या विरोधात केली होती. राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी भाजपचा आग्रह होता. अखेर त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
तर आता राठोड हे शिंदे गटाला समर्थन देत आहेत. यामुळे आता राठोड यांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार का? असा सवाल सध्या उपस्थित झाला आहे. सध्या शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत चर्चा सत्र सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.
मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री अनेक वरीष्ठ राजकीय नेतेमंडळीच्या भेटीगाठी ते घेत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान, संजय राठोड यांचा मंत्रीमंडळात समावेश होणार की नाही? याबद्दल मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले.
याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची माहिती सांगितली. एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात माजी वनमंत्री आणि आमदार संजय राठोड यांना पोलिसांनी क्लीन चिट दिल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या व्यक्तव्यामुळे राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
एकनाथ शिंदेंकडून अब्दुल सत्तारांना बंडखोरीचे गिफ्ट, सत्तार म्हणाले, ‘ही मामुली गोष्ट नाही..’
…तेव्हा उद्धवसाहेब एकदाही बोलले नाहीत हा माझा आमदार आहे; बंडखोर आमदाराने पहिल्यांदाच व्यक्त केली नाराजी
वेस्ट इंडिज सिरीजमध्ये विराटचे नाव का नाही? स्वतः विराटच आहे याला जबाबदार, झाला मोठा खुलासा
इम्रान हाश्मीने कॉफी विथ करणमध्ये व्यक्त केली इच्छा, म्हणाला, मला दिपीकासोबत…