Share

अजित पवारांचे बंड तर थांबवले पण सेनापतींसह सैन्य भाजपमध्ये दाखल; राष्ट्रवादीला मोठे खिंडार

BJP

Politics: नाशिकच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे दोन गट पडले. ठाकरे गटाला नाशिक जिल्ह्यात मोठा फटका बसला होता. त्यावेळी अनेकांनी शिवबंधन सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. आता नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेससह समता परिषदेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख माजी मंत्री छगन भुजबळ यांना नाशिकमध्ये मोठा फटका बसला आहे. छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सटाण्याचे माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला असुन भाजपची वाट धरली आहे. मंगळवारी सुनिल मोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

सुनील मोरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा सोहळा मुंबईतील भाजप कार्यालयात पार पडला. यामध्ये काही सरपंचांचा देखील समावेश होता.

सुनील मोरे हे भुजबळ यांचे निकटवर्तीय होते. पण पक्षाचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे, सुनील मोरे यांच्या पक्ष प्रवेशामुळे नाशिक ग्रामीणमधील भाजपला मोठी ताकद मिळणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

तीन दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक दौरा केला. यावेळी पडद्याच्या आड काही हालचाली झाल्या असल्याचं बोललं जात आहे. सुनील मोरे यांनी यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चेला उधाण आलं.

दरम्यान, सुनील मोरे हे सटाणा येथील शहर विकास आघाडीचे संस्थापक आहेत. ते सनाटाचे माजी नगराध्यक्ष आहेत. याशिवाय ते छगन भुजबळ चालवत असलेल्या समता परिषदेचे माजी ग्रामीण जिल्हाप्रमुख देखील आहे. त्यामुळे भाजपकडून छगन भुजबळ यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या
‘सत्तेच्या नशेत भावना पण मेल्या आहेत’; उष्माघाताने लोकांचे जीव जात असताना सत्ताधाऱ्यांचे शाही जेवण
अभिषेक-ऐश्वर्याच्या अवघ्या ११ वर्षीय मुलीची कोर्टात धाव; आराध्या बच्चनसोबत नेमकं काय घडलं?

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now