राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना चर्चेची दारे खुले ठेवण्यात आली आहे. पण एकनाथ शिंदे शिवसेनेच्या बंडखोर सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपने आतापर्यंत या प्रकरणावर थेट भाष्य केलेलं नाही.
मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीला भाजपचा पाठिंबा आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक सूचक विधान केलं आहे. ते याबाबत शुक्रवारी पत्रकारांशी बोलत होते. पाटीलयांच्या विधानाने आणखीच घडामोडींना वेग येणार असल्याच बोललं जातं आहे.
माध्यमांशी बोलताना पाटील यांनी सांगितलं की, ‘सध्या राज्यात ज्या राजकीय हालचाली सुरू आहेत, त्याच्याशी भाजपचा काडीमात्र संबंध नाही. मात्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपकडे प्रस्ताव आल्यास त्यावर विचार केला जाईल,’ असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं.
‘गेले तीन दिवस सतत फडणवीस हे कार्यकर्त्यांच्या कामासाठी दिल्लीला जात आहेत. शिवसेनेतील बंडामागे कोणता राष्ट्रीय पक्ष आहे हे शिंदे यांनाच विचारावे लागेल. राज्यात ज्या काही हालचाली सुरू आहेत, त्याच्याशी आपला संबंध नाही. शिंदे यांच्यासोबत कोण गेलेत, कोण जाणार आहेत, काहीही माहिती नसल्याच पाटील यांनी सांगितलं.
वाचा नेमकं राज्यात काय घडतंय..? राज्यभरात एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीचे पडसाद उमटत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाराज असलेले शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास ५० हून अधिक आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
तसेच शिंदे गटासोबत जाणाऱ्या आमदारांची संख्याही वाढताना दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्यास केंद्रीय यंत्रणांकडून होणाऱ्या कारवाया बंद होतील, असा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी ही बंडखोरी केल्याचे म्हटले जात आहे. पण या बंडखोरीमुळे शिवसैनिक तापले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
एकनाथ शिंदेंच्या गटात होणार बंड; शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याने टाकला मोठा डाव
सख्ख्या आईला सोडलं तर फडणवीसांना काय साथ देणार; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
जुग जुग जिओचा पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कमावले ‘इतके’ कोटी, प्रेक्षकांची पसंती
माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे दारूच्या नशेत झोकांड्या घेताहेत? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य