Share

राजकीय पक्षांच्या प्रचारसभांना बंदी; यापुढे करावा लागणार डिजिटल प्रचार, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. उत्तर प्रदेशसह गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. ही निवडणूक ७ टप्यात पार पडणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये 10 फेब्रुवारीपासून मतदानाला सुरुवात होणार आहे.

निवडणूकांची घोषणा करताना निवडूक आयोगाने कोरोना नियमांचं पालन होणार असल्याचे सांगितलं आहे. कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने काही महत्वाचे निर्बंध लागू केले आहेत. निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी प्रचारसभांना बंदी घातली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना डिजिटल प्रचार करावा लागणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा कालावधी एक तासाने वाढण्याचा निर्णयही निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने नवी नियमावली जाहीर केली आहे. आजपासून कोड ऑफ कंडक्ट अर्थात आचारसंहिता निवडणूका होणाऱ्या राज्यांमध्ये लागू होईल. निवडणूक होणाऱ्या राज्यांमध्ये प्रचारादरम्यान कोरोना नियमांचं पालन करणे बंधनकारक असेल.

१५ जानेवारीपर्यंत रॅली, सभा, रोड शो, साईकल आणि बाईक रॅलीवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. त्यानंतर परिस्थिती पाहून याबाबतचा निर्णय घेतला जाईल. रात्री आठनंतर सकाळी आठ पर्यंत निवडणूक प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच घरोघरी प्रचारासाठी पाच लोकांना परवानगी देण्यात आली आहे.

संपर्कविरहीत प्रचार व्हावा यासाठी टीव्हीवर सर्व पक्षांना मिळणारा कालावधी दुप्पट करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला आहे. राजकीय पक्षांना डिजिटल प्रचार करण्यास मुभा देण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मास्क आणि सॅनिटायझेशनची व्यवस्था करण्यात येईल. कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई होणार आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
लग्जरी गाड्यांसह ‘एवढ्या’ करोडचा मालक आहे पवनदीप राजन, जगभरात केलेत १२०० शोज
मोदींच्या रॅलीत घातपात करण्याचा डाव? पंजाबमधून तीन शार्प शुटर अटकेत, हॅन्ड ग्रेनेडही जप्त
मामा गाडी घेऊन लवकर या, आमचा चौघांचा गळा चिरलाय; महाराष्ट्राला हादरवणारी घटना

 

राजकारण

Join WhatsApp

Join Now