राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सेक्स रॅकेटची अनेक प्रकरणे समोर येत आहे. गुन्हेगारांनी हॉटेल्स, मसाज पार्लरला सेक्स रॅकेटचा अड्डा बनवला आहे. मुंबई पोलिसांनी अनेक सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. आता असेच एक प्रकरण पिंपरीतून समोर आले आहे (police rescue 3 women in pimpri sex racket)
पिंपरीतील पोलिसांनी एका लॉजवर चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी ३ तरुणींची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. सुटका करण्यात आलेल्या महिलांमध्ये छत्तीसगडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा समावेश आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दोन दलालांना अटक केली आहे. ताथवडे येथील साई लॉजवर पोलिसांनी ही कारवाई केली. अभिनेत्रीशिवाय सुटका करण्यात आलेली एक महिला मुंबईची तर दुसरी राजस्थानची आहे. पिंपरीतील या सेक्स रॅकेटमध्ये छत्तीसगडची एक प्रसिद्ध अभिनेत्री सहभागी असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी काही लोकांना बनावट ग्राहक बनवून पुणे-मुंबई रस्त्यावरील साई लॉजवर पाठवले. आरोपी पूर्णपणे जाळ्यात सापडल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा सेक्स रॅकेटचा धंदा चालवला जात होता.
या सेक्स रॅकेटमध्ये अभिनेत्री आणि इतर महिलांवर जबरदस्ती केली जात होती. या महिला शरीरसंबंधाच्या बदल्यात प्रत्येक व्यक्तीकडून तीस ते पस्तीस हजार रुपये घेत होत्या आणि दलाला देत होत्या. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव जितेंद्र आहे.
आरोपी मोबाईलवर व्हॉट्सऍपद्वारे मुलींना वेगवेगळ्या लॉजवर वेश्याव्यवसायासाठी पाठवत असे. या सर्व तरुणी त्याच्या नावाने खोल्या बुक करायच्या. वेश्याव्यवसायाच्या दलदलीत अडकलेल्या छत्तीसगडमधील एका अभिनेत्रीसह तीन तरुणींची या प्रकरणातून पोलिसांकडून सुटका केली आहे.
आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. जितेंद्र हस्तीमल बोकाडिया उर्फ हितेश हस्तीमलजी ओसवाल आणि हेमंत शाहू अशी त्यांची नावे आहेत. याशिवाय मुकेश केशवानी, करण, युसूफ उर्फ लंगडा शेख यांच्याविरुद्ध वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
३ रुपयांच्या शेअरच्या किंमतीत जबरदस्त वाढ, गुंतवणूकदारांच्या १ लाखाचे झाले ६ कोटी; मिळाला बंपर परतावा
‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाची दमदार सुरूवात; पहिल्याच दिवशी केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई
महेश भट फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना ड्रग्ज व पोरी पुरवतात; सुनेच्या गंभीर आरोपांनी उडाली होती खळबळ