Share

देवेंद्र फडणवीसांच्या घरी मुंबई पोलीस जाणार, चौकशीही करणार; राज्याच्या राजकारणात खळबळ

devendra fadanvis

सध्या राज्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विरुद्ध ठाकरे सरकार असा वाद पाहायला मिळत आहे. गृह मंत्रालयातील बदल्यांचा घोटाळा बाहेर काढल्याने मुंबई पोलिसांनी नोटीस बजावल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे. त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन याबाबत सांगितले आहे. (police officers visit devendra fadanvis house)

यावेळी पोलिसांच्या सायबर सेलनं उद्या चौकशीसाठी आपल्याला बोलावलं असून मी त्यासाठी जाणार असल्याची माहितीही देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या या पत्रकार परिषदेनंतर काही तासांतच हैराण करणाऱ्या घडामोडी घडल्या आहे.

बीकेसी पोलिस देवेंद्र फडणवीसांना पोलिस ठाण्यात बोलावणार होते. पण आता एक वेगळीच माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या ऐवजी आता पोलिसच त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाणार आहे. या माहितीमुळे एकच खळबळ उडाली आहे.

देवेंद्र फडणवीसांचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबईल पोलिसांनी त्यांना बीकेसीतील पोलिस ठाण्यात बोलावलं होतं. त्यासाठी आपण उद्या पोलिस ठाण्यात जाऊन जबाब नोंदवणार असल्याचे म्हटले आहे. अशी माहिती फडणवीसांनी पत्रकार परिषद दिली होती.

आता पोलिस अधिकारीच देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. देवेंद्र फडणवीस आता पोलिस ठाण्यात जाणार नाहीत. त्याऐवजी पोलिस अधिकारीच फडणवीसांच्या घरी जाऊन जबाब घेणार आहे.

देवेंद्र फडणवीसांनी पोलिस ठाण्यात बोलावून जबाब नोंदवण्यासंदर्भात गृहखात्यात बरीच चर्चा झाली आहे. अशात देवेंद्र फडणवीस पोलिस ठाण्यात आल्यास भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरू शकतात. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच फडणवीसांना पोलिस ठाण्यात न बोलवण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच देवेंद्र फडणवीसांना पोलिस ठाण्यात न बोलवण्याची काही कारणंदेखील आहेत. फडणवीस पोलिस ठाण्यात गेल्यास तिथे भाजप कार्यकर्ते जमतील अशीही शक्यता आहे. याआधीही भाजप नेते जेव्हा जेव्हा पोलिस ठाण्यात गेले आहेत, तेव्हा तेव्हा पोलिस ठाण्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते जमा होताना दिसून येतात.

महत्वाच्या बातम्या-
बच्चू कडूंवर कोसळला दुखाचा डोंगर; सर्वात जवळच्या व्यक्तीचे झाले निधन; भावूक होत म्हणाले…
‘या’ ५ वर्षाच्या गरीब पोराच्या बॅटींगचा फॅन झाला सचिन; खूष होत स्वत: दिली ५ दिवस ट्रेनिंग
हनिमूनच्या रात्रीच सापडला बायकोच्या बलात्काराचा व्हिडिओ; नवऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now