Share

भाजप शहराध्यक्षाच्या घरावर पोलिसांनी छापा मारताच उडाली खळबळ, चालू होता जुगाराच अड्डा

मधल्या काळात राज्यातील कित्येक जुगारांच्या अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई केली होती. आता देखील सोलापूरातील एका जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. परंतु हा अडा कोणत्या सामान्य माणसाचा नसुन चक्क तो भाजपच्या नेत्याचा असल्याचे समोर आले आहे. दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुधनी गावात पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

या कारवाईत पोलिसांनी 4 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये जुगाराचे साहित्य आणि वाहनांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुधनी गावात भाजपच्या शहराध्यक्षाच्या घरातच जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारेच पोलिसांनी भाजप नेते सैदप्पा परमशेट्टी यांच्या घरावर छापा टाकला.

यावेळी त्यांना परमशेट्टी यांच्या घरातील एका खोलीतच जुगाराचा खेळ सुरु असल्याचे दिसले. यानंतर त्यांनी सैदप्पा परमशेट्टी यांच्यासह इतर व्यक्तींना ताब्यात घेतले. या सर्वांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. गुन्हे दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये नागप्पा दत्तप्पा व्हंडारी, इष्टलिंगप्पा श्रीशैल अमाणे, नामदेव पांडू राठोडसह इतर काहींचा समावेश आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रदीप काळे आणि त्यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे भाजप नेत्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. सोलापुरात या महिन्यात करण्यात आलेली ही दुसरी कारवाई आहे. परंतु या कारवाईत एका भाजप नेत्याचे नाव आल्यामुळे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.

दरम्यान राज्यांतील जुगारांच्या अड्ड्यांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. कायदेशीरदृष्ट्या जुगाराचे अड्डे चालविण्यावर बंदी आहे. परंतु तरी देखील छुप्प्या पध्दतीने हे अड्डे चालविले जातात. मधल्या काळात सांगली, मिरज आणि कुरवाडमध्ये तीनपानी जुगाराचे शंभरपेक्षा अड्डे असल्याचे समोर आले होते. तेव्हा देखील पोलिसांनी मोठी कारवाई केली होती.

अशा अनेक कारवाया रोज कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात पोलिस करत असतात. मात्र तरी देखील असे अड्डे सुरुच असतात. सरकार देखील अनेकवेळा याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसुन येते.

महत्वाच्या बातम्या
बप्पी लहरींसोबत ब्रालेस फोटो शेअर करणे अदा शर्माला पडले महागात, नेटकऱ्यांनी झाप झाप झापले
गुंडांचा धुमाकूळ! हातात तलवारी घेऊन वाहनांची केली तोडफोड, लोकांची दुकानं केली बंद
नवाब मालिकांना ईडीच्या कोठडीत पोटदुखीचा त्रास, उपचारासाठी जे. जे रुग्णालयात केले दाखल
साऊथच्या ‘पुष्पा’नंतर पावनखिंड चित्रपटाने रचला इतिहास, हिंदी चित्रपटही पडले फिके

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now