Share

हात जोडून उभ्या असलेल्या वृद्धाला पोलिसाने मारल्या लाथा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर अनेकदा पोलिसांचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल असतात. अनेकदा पोलिस लोकांची मदत करताना दिसून येतात. त्याचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पोलिसांच्या नावाला काळिमा फासत आहे. (police beat old man)

गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या गैरवर्तवणूकीच्या घटना समोर येत आहे. असे असतानाच अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधून समोर आली आहे. एक पोलिसाने हात जोडून उभा असलेल्या वृद्धाला लाथा मारल्याची घटना घडली आहे. याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पोलीस कर्मचारी हात जोडून उभ्या असलेल्या एका वृद्धाला लाथ मारताना दिसत आहे. तसेच हा व्हिडिओ माजी आयपीएस अधिकारी आर के विज यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

https://twitter.com/ipsvijrk/status/1488163455475789828?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1488163455475789828%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmatnews.in%2Findia%2Fup-policeman-seen-kicking-old-man-standing-with-folded-hands-former-ips-shared-video-b615%2F

हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील आहे. व्हिडिओमध्ये वृद्ध व्यक्ती पोलिसासमोर हात जोडून बोलताना दिसत आहे. बोलत असलेला वृद्ध माणूस उजवीकडे पाहतो. त्यानंतर तो पोलिसासमोर हातही जोडतो. पण त्यानंतर पोलीस त्याला लाथ मारायला सुरुवात करतो. तसेच त्याला दोनदा लाथ मारून ‘भाग भाग’ म्हणतो. आजूबाजूला लोकांची गर्दीही दिसते.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. तसेच पोलिसांचे असे वर्तवणूक चुकीचे असल्याचे म्हटले आहे. काही लोकांनी म्हटले आहे, की पोलिसांनी समोरची व्यक्ती वृद्ध आहे, याचे तरी भान ठेवावे.

माजी आयपीएस अधिकारी आर.के. विज यांनी व्हिडिओ शेअर करत पोलिसावर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. काही पोलिस पैसे देऊन आपण सुधारु नाही शकत. तर त्यांना योग्य प्रशिक्षण आणि कठोर शिस्तबद्ध कारवाईनेच सुधारले जाऊ शकते, असे आर के विज यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
महिला शिक्षिकेने आपल्याच विद्यार्थ्याशी बनवले शारीरिक संबंध; नंतर शिक्षेपासून वाचवण्यासाठी केले ‘हे’ लाजिरवाणे कृत्य
हिंदूस्थानी भाऊचे चाहत्यांना आवाहन; माझ्या नावाखाली लोकं अराजकता पसरवत आहेत, प्लिज..
नितेश राणेंना दणका! कोर्टानं दोन दिवसांची सुनावली पोलीस कोठडी; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now