अनेकदा शेतकऱ्यांना हवे तसे उत्पन्न मिळत नसल्यामुळे ते शेतात वेगवेगळे प्रयोग करताना दिसून येतात. बऱ्याचवेळा शेतकऱ्यांना या प्रयोगांचा चांगला फायदा होऊन याचे त्यांना चांगले पैसेही मिळतात. पण एका शेतकऱ्याने असा प्रयोग केला की ते पाहून पोलिसही चक्रावले आहे. (police arrested prakash patil for weed farming)
शेतकऱ्याने युट्युबवर पाहून थेट अफूचीच शेती केली होती. त्यानंतर पोलिसांनी धाड टाकून शेतकऱ्याला अटक केली आहे. जळगावातील चोपडा तालुक्यातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर पोलिसांनी तरुणावर कारवाई केली आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वाळकी येथे संशयित प्रकाश सुदाम पाटील या तरुणाकडे सहा एकर शेती आहे. परंतू सततच्या नापिकीमुळे तो कर्जबाजारी झाला होता. अशातच त्याने आपल्या शेतात एक नवा प्रयोग करण्याचे ठरवले. त्याने युट्युबवर व्हिडिओ बघितला आणि अफूची शेती करायचे ठरवले.
नापिकीमुळे प्रकाशला कोणताही पर्याय दिसत नव्हता. त्यामुळे त्याने शेतात अफूची शेती करण्याचे ठरवले. त्याने युट्युबवर अफूच्या शेतीचे धडे गिरवायला सुरुवात केली. यानंतर त्याने तब्बल सहा एकर शेतीत अफूची लागवड केली. तसेच कोणाला संशय येऊ नये, म्हणून त्याने शेजारी मक्याचे पीक घेतले.
अशात या शेतीची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी शेतावर धाड टाकली. शुक्रवारी पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांच्यासोबत मोठ्या टीमसह शेतावर धाड टाकली. तसेच तरुणावर कारवाई केली. याबाबत बोलताना तरुणाने आपल्यावर खुप कर्ज होते, म्हणून मी अफूच्या शेतीचा मार्ग निवडला, असे म्हटले आहे.
प्रकाशने डिसेंबर महिन्यात या अफूच्या शेतीची लागवड केली होती. त्यामुळे अफू पुर्णपणे तयार झाले होते. तो येत्या १५ दिवसांत या अफूची कापणी करणार होता. पण त्यापूर्वीच पोलिसांनी ही कारवाई केली आहे. प्रकाशने बाजारात दीड ते दोन किलो अफू खसखसच्या स्वरुपात विकल्याचे समोर आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
कांदा कापताना आईच्या डोळ्यातून येत होते अश्रू, ते थांबवण्यासाठी सातवीच्या ओंकारने केली स्मार्ट चाकूची निर्मिती
१३ बेडरूमचं घर, लक्झरी गाड्या आणि बरंच काही मागे सोडून गेला शेन वॉर्न, संपत्तीचा आकडा वाचून डोळे फिरतील
कपिल देवचा ३६ वर्षांपूर्वीचा विक्रम रविंद्र जडेजाने काढला मोडून; ‘हा’ विक्रम करणारा बनला दुसरा भारतीय फलंदाज