विशाखापट्टणमहून दिल्लीला गांजा घेऊन जाणाऱ्या आई आणि मुलीसह चार जणांना जीआरपीने आग्रा कँट रेल्वे स्थानकावर अटक केली आहे. त्यांच्याकडून ४० किलो गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजे किंमत ४ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. (police arrest daughter and mother who selling weed)
आग्रा/इटावा सीओ जीआरपी दरवेश कुमार यांनी सांगितले की, दक्षिण भारतातून येणाऱ्या गाड्यांमध्ये गांजाची तस्करी रोखण्यासाठी स्थानकांवर विशेष तपासणी केली जात आहे. शनिवारी सकाळी चार जण विशाखापट्टणम येथून ट्रेनमधून उतरले. त्यात दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश होता, त्यांना पोलिसांनी अटक केली.
संशयावरून स्टेशनच्या मागील गेटवर तैनात असलेल्या जीआरपी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सामानाची झडती घेतली असता चार पोत्यांमध्ये ४० किलो गांजा सापडला. अटक करण्यात आलेल्यांमध्ये उत्तराखंडमधील बलविंदर सिंग, सोमरतन तसेच रणजीत कौर आणि तिची मुलगी संदीप कौर यांचा समावेश आहे.
पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरु केली आहे. चौकशीत आरोपीने सांगितले की, ते विशाखापट्टणम येथून गांजा खरेदी करून दिल्लीला जात होते. दिल्लीत त्यांना स्टेशनबाहेरील एका व्यक्तीकडे माल पोहोचवायचा होता. उधमसिंह नगरमध्ये एक व्यक्ती गांजा ऑर्डर करतो, असे त्यांनी सांगितले आहे.
एका मालासाठी प्रति व्यक्ती पाच हजार रुपये दिले जातात, असे त्यांनी सांगितले. त्यांना गांजा कोठून पुरवला जातो हे त्यांना माहीत नाही. सीओ जीआरपी दरवेश कुमार यांनी सांगितले की, चौकशीदरम्यान उधम सिंह नगरच्या रणजीतचे नाव समोर आले आहे. त्याचा मोबाईल क्रमांकही सापडला आहे. आता पोलिस त्याचा शोध घेत आहे.
अटक करण्यात आलेले चौघे जणांनी आपण फक्त गांजाची ने-आण करत असल्याचे सांगितले. यामध्ये आई आणि मुलगीही दररोज १० हजार रुपये कमावण्याच्या लालसेने ओळखीच्या व्यक्तींसोबत आल्या होत्या. हे चारही आरोपी मूळचे बरेलीचे रहिवासी असले तरी ते आता उधम सिंग नगरमध्ये राहत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
ऍपवरुन कर्ज घेणे तरुणाला पडले महागात, वसूली एजंटने बायकोचे अश्लील फोटो केले व्हायरल
२२ वर्षाच्या तरुणीने घरी सांगितलं पार्लरला जातेय, अर्ध्या तासानंतर जे झालं ते ऐकून संपूर्ण कुटूंब हादरलं
भारताच्या ‘या’ स्टेशनवर जाण्यासाठी लागतो व्हिसा; नियम पाळले नाही, तर थेट टाकतात तुरुंगात