Share

महिलेने टिकली लावल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्याचे लाजीरवाणे कृत्य; शिवीगाळ करत महिलेला…

महिला अनेकदा आपले सौंदर्य वाढवण्यासाठी टिकली लावत असतात. पण एक असे प्रकरण समोर आले आहे की, टिकलीमुळे एका महिलेचा जीव धोक्यात आला होता. बांगलादेशमधून ही घटना समोर आली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने एका महिलेला टिकली लावल्यामुळे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. (police angry on women because on bindi)

आता पीडित महिला पोलिस ठाण्यात गेली आहे. तसेच तिने तक्रार केली आहे. मी महाविद्यालयात जात असताना, लांब दाढी असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने तुम्ही टिकली का लावली? असे म्हणत मला शिवीगाळ केली. तसेच मला जीवे मारण्याची धमकी दिली, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेची बातमी सोशल मीडियावर झपाट्याने पसरली आहे, त्यानंतर अनेकांनी त्या पोलिसावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अभिनेत्री आणि खासदार सुबोर्णा मुस्तफा यांनीही रविवारी संसदेत या घटनेवर चर्चा करताना त्रास देणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

मानवी हक्क कार्यकर्त्या नूरजहान खान यांनी सोमवारी आयएएनएसला सांगितले की, ही घटना पोलिस प्रशासनाच्या एका विभागाद्वारे घडवून आणलेला जातीयवादाचा प्रकार आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

हिंदू परिषदेनेही याला विरोध केला आहे. अधिवक्ता राणा दासगुप्ता म्हणाले, पोलिस अधिकाऱ्याची ओळख उघड झाली पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. या परिस्थितीतून आपली सुटका झाली नाही, तर बांगलादेशचे भविष्य नक्कीच अंधकारमय असेल.

या प्रकरणी माजी अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक विक्रम किशोर त्रिपुरा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, दोषी पोलिस अधिकाऱ्याची ओळख पटवून त्वरित विभागीय कारवाई केली जावी. तसेच याप्रकरणी कार्यकर्ते आणि कवी इम्तियाज महमूद यांनी कपाळावर टिकली लावलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून निषेध केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
मोठमोठ्या नेत्यांची चौकशी करणाऱ्या ईडीचीच चौकशी ठाकरे सरकार करणार; गृहमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश
शिवसेनेचे १४ खासदार भाजपच्या संपर्कात, तर २४ आमदार नाराज, भाजप नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
जेलमध्ये टाकलं तरी मस्ती गेली नाही; टिक-टॉक स्टारचा सहकाऱ्यांसोबत धिंगाणा, व्हिडिओ व्हायरल

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now