Share

४३ वर्षानंतर पोलंड ‘त्या’ मदतीची करतोय परतफेड, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची करतोय मदत

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने शहर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या विद्यार्थांना वेगवेगळ्या शहरांमध्ये घेऊन जाण्यात येत आहे. मुख्य म्हणजे भारतीय विद्यार्थांना मदत करण्यासाठी पोलंडने पुढाकार घेतला आहे. हे तेच पोलंड आहे ज्याची एक पिढी भारतातील एका महाराजांने सांभाळली होती.

दुसऱ्या महायुध्दात पोलंडवर रशियाने आक्रमण केले होते. त्यावेळी भारताने पोलंडच्या हजारो मुलांचे पालकत्व स्विकारले होते. या युध्दामध्ये आताच्या जामनगरचे राजा दिग्विजय सिंहजी जडेजा यांनी कित्येक मुलांचे प्राण वाचवत त्यांना जामनगरमध्ये आणले होते. यासाठी त्यांनी पोलंड सरकारकडून एक ही रुपया घेतला नव्हता.

पोलंडमधून आणलेल्या मुलांना सिंहजी जडेजा यांनीच काहीकाळ सांभाळले होते. या मुलांची पोलंडशी नाळ तुटू नये म्हणून त्यांनी पोलिश पुस्तकांची लायब्ररी उघडली होती. यानंतर महाराजांच्या निधनावेळी सरकारने त्यांना मरणोत्तर सर्वोच्च नागरिक सम्मान कमांडर्स क्रॉस ऑफ दि ऑर्डर ऑफ मेरिट प्रदान केले होते.

एवढेच नव्हे तर पोलंडने तेथील रस्ते, शाळा संस्था महाराजांच्या नावाने उघडल्या होत्या. सांगण्यात येते की, दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने सोव्हिएत संघाशी हातमिळवणी केल्यानंतर 1939 मध्ये जर्मनीने पोलंडवर हल्ला केला होता. या हल्ल्याचे काही दिवस उलटताच रशियाने देखील पोलंडवर हल्ला केला. यात पोलंडचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले.

तसेच हजारो लोकांनी आपले गमावले होते. यामुळे अनेक मुले अनाथ झाली. त्यामुळे त्यांना सैनिकी कॅम्पमध्ये ठेवण्यात आले. परंतु दुसऱ्याच वर्षात हा कॅम्प खाली करण्यात आला. यामुळे सर्व मुले उघड्यावर पडली. या मुलांना आता कुठे ठेवायचे यासाठी ब्रिटनमध्ये वॉर कैबिनेटची बैठक झाली.

या बैठकीला महाराजा उपस्थित होते. त्यांनी कसला ही विचार न करता मुलांची जबाबदारी आपल्यावर घेतली. यावेळी त्यांनी म्हटले की, तुमची मुले माझी संपत्ती आहे. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा त्यांना तुम्ही मायदेशी घेऊन जाऊ शकता. 1945 ला महायुद्ध संपल्यावर पोलंड सोव्हिएत संघात विलिन झाले आणि त्यांनी मुलांना परत मायदेशी नेले.

सोव्हिएतपासून पोलंड 1989 ला स्वतंत्र झाले. आज या घटनेला ४३ वर्षे उलटून गेली असताना पोलंड महाराजांनी केलेल्या मदतीची परत फेड करत आहे. पोलंडने महाराजांनी केलेल्या मदतीची आजवर जाण ठेवली ही खूप मोठी गोष्ट आहे.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now