Share

मी असे पुरस्कार घेत नाही पण, ‘हा’ माझा पहिला अन् शेवटचा पुरस्कार; मोदींनी मंगेशकर कुटुंबीयांना स्पष्टच सांगितलं

modi

भारतरत्न लता मंगेशकरांच्या निधनानंतर पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पहिल्याच वर्षी या पुरस्काराचे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले आहेत. देशहित आणि समाजहितासाठी काम करणाऱ्या एका व्यक्तीला हा पुरस्कार दिला जाणार आहे.

आनंदाची बाब म्हणजे, यावर्षीपासून सुरू झालेल्या लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराचे पहिले मानकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले आहेत. याचबरोबर मोदींनी हा पुरस्कार स्वीकारल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. मोदींना या पुरस्काराने 24 एप्रिलला मुंबईत सन्मानित करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, पुरस्काराविषयी ह्रदयनाथ मंगेशकर यांनी भाष्य केले आहे. ‘मोदींनी हा पुरस्कार स्विकारला. मात्र, मी असे पुरस्कार घेत नसतो. पण, हा आयुष्यातला पहिला आणि शेवटचा पुरस्कार असेल, असे मोदींनी म्हटल्याचे पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांनी सांगितले.

‘अन्य कुठल्याही संस्थांचे ते पुरस्कार घेणार नाहीत, बाकी राजकारणाचे होतीलच. पण, घोषित करुन असे पुरस्कार ते घेणार नाहीत, असेही ह्रदयनाथ मंगेशकर यांनी सांगितलं आहे. ‘पंतप्रधान मोदी ही दिग्गज व्यक्ती आहे, ते आंतरराष्ट्रीय किर्तीचे आहेत. त्यामुळे, मोदींनी हो म्हणावं हीच मोठी गोष्ट आहे. माझा मुलगा आदिनाथ मंगेशकरने खूप प्रयत्न केले आणि त्यांचा होकार मिळवला असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, पुरस्काराविषयी बोलताना ह्रदयनाथ मंगेशकर यांनी एक आठवण सांगितली आहे. ते म्हणतात, ‘आम्ही दिनानाथ मंगेशकर नवं हॉस्पिटल बांधलं होतं तेव्हा मोदींनी या हॉस्पिटलचं उद्घाटन केलं होतं. तेव्हा भाषणात लता दिदींनी, ‘गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे मला मोठ्या भावासारखे आहेत, ते देशाचे पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा असल्याचे व्यक्त केली होती.’

याचबरोबर तसेच नरेंद्र मोदी यांच्यासोबतच गायक राहुल देशपांडे, अभिनेत्री आशा पारेख, अभिनेते जॅकी श्रॉफ आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनाही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच ‘स्वर कोकिळा’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या गायिका लता मंगेशकर यांचे निधन झाले. मात्र करोडो चाहत्यांच्या मनामध्ये अजूनही त्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
ईशान किशनला कोट्यवधी रुपये मिळाल्यानंतर वडील पोहोचले होते हॉस्पिटलमध्ये, किस्सा वाचून पोट धरून हसाल
राज ठाकरेंना दंगल पेटवायची असेल तर त्यांनी आधी स्वताच्या मुलाला रस्त्यावर उतरवावं; सुजात आंबेडकरांचं चॅलेंज
भयानक! जबरदस्तीने महिलेवर बलात्कार केल्यानंतर गुप्तांगात घातला रॉड, अटक झाल्यावर म्हणाला..
दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय ब्राम्हणच असतात; सुजात आंबेडकरांचा थेट आरोप

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now