महापालिकेच्या निवडणूकांमुळे राजकीय नेते आपल्या पक्षासाठी कामाला लागले आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे भाजपने आघाडी घेतली आहे. त्यांच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोचा लोकार्पण सोहळा पार पडला. (pimpri metro windshield broke)
पुण्यासोबतच आज पिंपरी-चिंचवड मेट्रोचेही नरेंद्र मोदी यांचे हस्ते उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर पुणेकरांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे. रविवारी दुपारी तीन ते रात्री नऊ यावेळेत पुणे आणि पिंपरीतील दोन्ही मार्गिकांवर मेट्रोची सेवा नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे.
तसेच सोमवारपासून पुणेकरांना दररोज सकाळी आठ ते रात्री नऊदरम्यान मेट्रोतून प्रवास करता येणार आहे. असे असतानाच आता एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. पिंपरी ते फुगेवाडी येथील मेट्रोच्या दोन कोचच्या काचांना तडे गेल्याचे समोर आले आहे.
ही बाब मेट्रोच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पण नंतर त्यांनी हा देखभालीचा भाग असल्याचे सांगितले. त्यामुळे आता मेट्रो सुरु करण्यास एवढी घाई का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
उद्घाटनाच्या दिवशीच मेट्रोच्या डब्याच्या काचांना तडे गेल्याने अनेकांनी आश्चर्य वक्तव्य केले आहे. याबाबत अधिकाऱ्यांना विचारण्यात आले असता, मेट्रोच्या देखभालीसाठीच्या सर्व पायाभूत सुविधा आमच्याकडे तयार आहेत. मेट्रोची नियमित देखभाल होणार आहे. काचांना तडे का आणि कसे गेले? हे तपासण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मेट्रो रेल्वेचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन ते आनंद नगर मेट्रो स्टेशन असा प्रवास केला. मोदींच्या मेट्रो ट्रेनच्या प्रवासादरम्यान काही मुलेही दिसली. मेट्रो ट्रेनमध्ये प्रवास करताना पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांव्यतिरिक्त पंतप्रधान मोदी मेट्रो ट्रेनमध्ये उपस्थित सर्वसामान्यांशी संवाद साधतानाही दिसले.
महत्वाच्या बातम्या-
फडणवीसांविरोधातील संताप उफाळला! पिंपरीत देवेंद्र फडणवीसांवर भिरकावली चप्पल
सभा मोदींची आणि भाव खाल्ला अजित पवारांनी; वाचा नक्की काय घडलं?
हा आवाज कुणाचा? राज ठाकरेंचा…; ‘या’ चित्रपटातून राज ठाकरेंची चित्रपटक्षेत्रात दमदार एन्ट्री