Share

PHOTO: ‘कपिल शर्मा शो’मधील चंदू चायवाल्याची बायको आहे खुपच सुंदर, बड्या अभिनेत्रींनी पडतील फिक्या

कपिल शर्माच्या (Kapil Sharma) ‘द कपिल शर्मा शो’मध्ये चहा विकून सर्वांना हसवणाऱ्या चंदूला तुम्ही चांगलेच ओळखता. चहा विकून आपल्या कॉमिक टायमिंगने सगळ्यांना हसवायला आणि गुदगुल्या करण्यात तो कसली कसर सोडत नाही. त्याने आपल्या विनोदांनी चाहत्यांना हसायला भाग पडले आहे, पण आज आपण चंदू चायवालेबद्दल नाही तर चंदू चायवालेच्या बायकोबद्दल बोलणार आहोत. (PHOTO’s of Chandu Chaiwala’s wife)

चंदू चायवाला या नावाने प्रसिद्ध असलेला चंदन प्रभाकर (chandan prabhakar) खऱ्या आयुष्यात किती भाग्यवान आहे हे तुम्हाला माहीत आहे का. जीवनात त्यांना चांगल्या मित्राची साथ लाभली, पण त्याचबरोबर त्यांची जीवनसाथीही खूप सुंदर आहे. होय, त्याची पत्नी बॉलीवूडच्या शीर्ष अभिनेत्रींशी सुंदरपणे स्पर्धा करते. सोशल मीडियावर चाहत्यांना चंदन प्रभाकरचे कमी पण त्याच्या कुटुंबाचे फोटो जास्त पाहायला आवडतात.

चंदू चायवाले म्हणजेच चंदन प्रभाकरच्या सुंदर पत्नीचे नाव नंदिनी खन्ना आहे. चंदन प्रभाकरने 2015 मध्ये नंदिनी खन्नासोबत सात फेरे घेत लग्न केले. आजही चंदनच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. नंदिनी खन्ना तिच्या लग्नाच्या लाल जोड्यामध्ये सुंदर दिसत होती. सर्व मोठ-मोठ्या अभिनेत्रीचे सौंदर्य तिच्या सौंदर्यासमोर फिके पडते. लांब केसांमध्ये नंदिनी अप्सरापेक्षा कमी दिसत नाही.

शोमध्ये चंदन जेव्हा चंदू बनतो, तेव्हा तो गर्लफ्रेंड शोधू लागतो, पण त्याचा शोध कदाचित कधीच संपणार नाही कारण त्याला त्याच्या बायकोसारखी दुसरी मुलगी सापडली नाही. चंदन प्रभाकर आणि त्यांची पत्नी नंदिनी खन्ना यांच्या आयुष्यात आनंदाची दारे उघडणारी त्यांची मुलगीही खूप गोड दिसते. आई नंदिनी प्रमाणे तिची मुलगी देखील खूप सुंदर दिसते.

लग्नानंतर नंदिनी त्याच्यासाठी लकी ठरली. त्याच्या नशिबाने वळण घेतल आणि चमकून गेली. जेव्हा त्यांचे लग्न झाले तेव्हा ‘द कपिल शर्मा शो’ पहिल्या क्रमांकावर होता पण नंतर काही कारणांमुळे हा शो बंद झाला. शो बंद झाल्यामुळे चंदन दु:खी झाला होता पण त्याच्याकडे खूप काम होते. अनेक पंजाबी चित्रपटांमध्येही तो दिसला होता.

See the source image

चंदन प्रभाकर यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंग केले आहे. चंदनला लहानपणापासूनच अभिनेता व्हायचं होतं पण घरच्या आर्थिक अडचणींमुळे तो काम करू लागला. अनेकदा तो सोशल फंक्शन्समध्ये मिमिक्री आणि स्टँड-अप कॉमेडी करून आपला छंद पूर्ण करत असे. काही काळानंतर त्यांची नोकरी गेली.

त्यानंतर 2007 मध्ये तो ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या सीझन 3 मध्ये दिसला. या शोमध्ये त्याला दुसरे स्थान मिळाले. त्यानंतर त्यांनी अनेक लघुपटांमध्ये काम केले. नंतर चंदन प्रभाकर द कपिल शर्मा शोमध्ये चंदू चायवालाच्या भूमिकेत दिसला, ज्यामुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

महत्वाच्या बातम्या
धुम्रपान तुम्ही करताय पण परिणाम नातवंडांना सहन करावे लागणार, संशोधकांचा मोठा खुलासा
खुन्नस ठेवून मित्रानेच काढला काटा; मुळशी पॅटर्न पाहून केला खून, आरोपीची पोलिसांकडे कबुली
‘औरंगाबादमधील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देणार; उद्धव ठाकरेंची घोषणा
‘मविआ सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?’ सोमय्यांना दिलेल्या नोटीशीमुळे फडणवीसांचा हल्लाबोल

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now