Homeताज्या बातम्याआई, भाऊ, बायको, मुलगी सगळे सोडून गेल्याने कपिल शर्मा शोमधील कलाकाराने घेतले...

आई, भाऊ, बायको, मुलगी सगळे सोडून गेल्याने कपिल शर्मा शोमधील कलाकाराने घेतले विष

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध ‘द कपिल शर्मा शो’ मधील एका कलाकाराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त समोर येत आहे. तीर्थानंद असे या कलाकाराचे नाव आहे. आर्थिक अडचणींना वैतागून त्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शेजाऱ्यांनी त्यांना त्वरित रूग्णालयात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, तीर्थानंद हे विरार येथील रहिवासी आहेत. मागील १५ वर्षापासून ते अभिनय क्षेत्रात काम करत आहेत. हिंदीसोबत त्यांनी ८ वेगवेगळ्या भाषेत काम केले आहेत. सिनेसृष्टीत त्यांना नाना पाटेकर यांचा डुप्लिकेट म्हणून ओळखले जाते. मात्र, मागील दोन वर्षापासून ते बेरोजगार आहेत. कोरोनामुळे त्यांना काम मिळत नाहिये. त्यामुळे आर्थिक अडचणींना कंटाळून त्यांनी आत्महत्या  करण्याचा निर्णय घेतला.

आजतकशी बोलताना तीर्थानंद यांनी सांगितले की, ‘मी विषप्राशन केलं होतं आणि माझी प्रकृती गंभीर होती. आर्थिक संकटामुळे मला माझ्या कुटुंबीयांनी सोडून दिले. मी रूग्णलयात असतानाही माझी आई आणि भाऊ मला बघायलासुद्धा आले नाही. आम्ही एकाच कॉम्प्लेक्समध्ये राहतो. आज १५ वर्ष झाले तरीही माझे कुटुंबीय माझ्याशी बोलत नाहीत. माझ्या उपचारावरही त्यांनी एक रूपयाही खर्च केला नाही’.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, ‘मी कर्जबाजारी आहे आणि रूग्णालयातून आल्यानंतर मी घरात एकटाच राहत आहे. एका व्यक्तीसाठी याहून दुसरं दुःख काय असू शकतं? आजपर्यंत माझ्या आईने मला जेवलास का? म्हणूनही विचारलं नाही. माझी पत्नी एक डान्सर होती आणि आम्हाला एक मुलगीसुद्धा आहे. पण माझ्या पत्नीने दुसरं लग्न केलं. तसेच माझ्या मुलीचेही लग्न झालं आहे. पण त्यांच्याशी माझं कोणताच संपर्क नाही’.

आत्महत्येचा प्रयत्न करण्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, ‘मी माझे कुटुंब आणि काम यामध्ये अडकून गेलो होतो. यामधून कसे बाहेर पडावे मला समजत नव्हते. एकीकडे काम बंद आहे आणि दुसरीकडे एकटेपणा असह्य होत आहे. त्यामुळे मी हे टोकाचं पाऊल उचललं’.

तीर्थानंद यांनी कपिल शर्मासोबत ‘कॉमेडी सर्कस के अजूबे’ या शोमध्ये काम केलं होतं. तसेच द कपिल शर्मा शोच्या काही भागातही ते दिसले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी त्यांच्या इतर कामामुळे कपिल शर्मा शो सोडला. तर आता बरे झाल्यानंतर ते कपिल शर्माकडे काम मागण्यासाठी जाणार असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या : 

‘पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना मरेपर्यंत फासावर लटकवा’; भाजप नेत्याची खळबळजनक मागणी
सिंधुताईंच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्याऐवजी दफनविधी का करण्यात आला? जाणून घ्या कारण..
मोठी बातमी! राज ठाकरेंना अटक होणार? कोर्टाने अटक वाॅरंट काढत दिले आदेश

ताज्या बातम्या