Share

राज ठाकरेंच्या सभेविरोधात याचिका करणाऱ्याला न्यायालयाचा दणका, १ लाखांचा दंड ठोठावत म्हणाले..

सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यांची १ मे रोजी होणारी औरंगाबादेतील सभाही सद्या राज्यभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. त्याला तशी कारणंही आहेत. आधी सभेला परवानगी मिळण्यावरून जोरदार वाद सुरू होता. आता परवानगी मिळाली आहे पण तरीही विरोधी पक्षांकडून या सभेला विरोध केला जात आहे.

या सभेला परवानगी जरी मिळाली असली तरी पोलिसांनी राज ठाकरेंना काही अटी दिल्या आहेत. या अटींची अंमलबजावणी आणि जातीय तेढ निर्माण होण्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेले आहे. याच मुद्द्यावरून औरंगाबाद खंडपीठासमोर जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. पण ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

तसेच याचिकाकर्त्याला एक लाखाचा दंडही भरावा लागणार आहे. न्यायालयाने त्याला टोला देत एक लाखांचा दंड ठोठावला आहे. रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हा प्रमुख जयकिशन कांबळे यांनी १ मे रोजी होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेविरोधात औरंगाबाद खंडपिठासमोर जनहित याचिका दाखल केली होती. सभा रद्दच करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती.

सभा जर झाली तर पोलिसांनी दिलेल्या अटींचे काटेकोर पालन झाले पाहिजे अशी भूमिका त्यांनी या याचिकेत मांडली होती. मात्र न्यायालयाने त्यांना दणका देत त्यांची याचिका फेटाळून लावली. तसेच त्यांना एक लाखांचा दंडही ठोठावला. न्यायालयाने असे नमूद केले की, याचिका राजकीय हेतून प्रेरित आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसांत १ लाख रुपयांचा दंड भरण्यास त्यांना सांगितले आहे.

दरम्यान, भीम आर्मी संघटनेनेही राज ठाकरेंच्या या सभेला विरोध दर्शवला आहे. “राज ठाकरेंची औरंगाबादमधील सभा उधळून लावू या भूमिकेवर आम्ही आजही ठाम आहोत, असे भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी म्हटलं आहे. राज यांच्या सभेबद्दल बोलताना ते याबाबत माध्यमांशी बोलत होते.

पुढे ते म्हणाले, ‘राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या १६ अटींचं जर राज ठाकरेंनी उल्लंघन केलं, तर त्याच सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापुरुषांच्या घोषणा तुम्हाला ऐकायला मिळतील.’

याचबरोबर आम्ही कुठल्याही व्यक्तीच्या विरुद्ध नाही. पण जो भारताच्या संविधानाच्या विरुद्ध वागेल, त्याच्याविरुद्ध आम्ही आहोत”, असं अशोक कांबळे यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, राज यांच्या सभेकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच सभेच्या पार्श्वभूमीवर राजकारण देखील तापलं आहे.

महत्वाच्या बातम्या
फेसबूकवर अश्लील भाषेत रुपाली पाटलांची केली बदनामी, १६ मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ शोमध्ये असं काय घडलं की संपूर्ण टीमला मागावी लागली माफी?
National Language Controversy : अजय-सुदीपच्या हिंदी भाषेच्या वादावर कलाकारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
‘प्राईम टाईम आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’; शेर शिवराजला प्राईम टाईम न मिळाल्याने संतापला अभिनेता

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now