उत्तर प्रदेशातील आणखी एका अत्तर व्यापाऱ्याच्या घरातून करोडो रुपयांच्या नोटांचा ढीग सापडला आहे. पियुष जैनच्या घरातून कोट्यवधींची रोकड मिळाल्यानंतर आयकर विभागाच्या पथकाला कन्नौजमधील आणखी एक अत्तर व्यापारी मोहम्मद याकूब मलिक यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोकड मिळाली आहे. मलिकच्या घरी सुमारे ४ तास मशीनद्वारे नोटा मोजण्यात आल्या. त्यामध्ये ३ ते ४ कोटी रुपयांची रोकड सापडल्याचे सांगण्यात येत आहे.
एवढेच नाही तर छाप्यात काही सोनेही जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे. नोटा मोजणीत सहभागी असलेल्या एका बँक कर्मचाऱ्याने ही माहिती दिली आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. आयकर विभागाचे पथक गेल्या २४ तासांहून अधिक काळ कन्नौजमधील अत्तर व्यापारी मोहम्मद याकूब मलिक यांच्या घरावर छापेमारी करत आहे.
वास्तविक, अत्तर व्यापारी याकूब यांच्या घरी नोटा मोजण्याचे यंत्र घेऊन पोहोचले होते. येथे सुमारे ४ तास मशीनद्वारे नोटांची मोजणी सुरू होती. नोटा मोजणीत गुंतलेल्या एका बँक कर्मचाऱ्याने बाहेर येऊन सांगितले की, मोजणीच्या तीन-चार तासांत सुमारे २ ते ४ कोटींची रोकड सापडली आहे. याशिवाय काही प्रमाणात सोनेही सापडले आहे, असे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
सध्या मोहम्मद याकुब यांच्या मंडई येथील निवासस्थानी रुपयाची मोजणी संपली असून, मशीन बँकेत परत पाठवण्यात आली आहे. सध्या तरी आयकर विभागाची टीम याकूब मलिकच्या घरी उपस्थित असून आयकरची चौकशी अजूनही सुरू आहे. छापेमारी पूर्ण झाल्यानंतरच आयकर विभागाची टीम वसुलीचा तपशील देईल, असे सांगण्यात येत आहे. याकूब मलिकच्या इतर ठिकाणांवर छापे टाकल्याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही.
शुक्रवारी आयकर विभागाचे पथक मोहम्मदचा भाऊ मोहसीनच्या घरी पोहचले होते. आयकर पथकाला पाहून सगळीकडे खळबळ उडाली होती. अत्तर व्यावसायिक मोहम्मद याकूब मलिक यांचा धाकटा भाऊ मोहम्मद मोहसीन मलिक यांच्या घरावर आयकर पथकांनी छापे टाकले. मोहसीन मलिक हा लखनौमधील हजरतगंज प्राग नारायण रोडवर राहतो.
अत्तर व्यापारी पुष्पराज जैन उर्फ पंपी जैन यांच्या कन्नौज येथील घरावर आणि वेगवेगळ्या ठिकाणी आयकर विभागाचे छापे सुरू आहेत. अत्तर व्यावसायिक पियुष जैन यांच्या मुसक्या आवळल्यानंतर आता आयकर विभागाच्या पथकाने पुष्पराज जैन यांच्यावर कारवाई केली आहे. आयकर विभागाचा हा छापा उत्तर प्रदेशातील कन्नौज, कानपूर, नोएडा, हाथरसपासून महाराष्ट्रातील मुंबईपर्यंत सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या :-
अनुष्का शर्माला ‘मम्मा मम्मा’ म्हणताना दिसली वामिका, चाहतेही झाले खुश; पहा मायलेकींचा खास व्हिडिओ
मंदिराच्या दानपेटीत कंडोम टाकून पळून जायचा ६२ वर्षांचा व्यक्ती; कारण ऐकून पोलिसांनाही बसला धक्का
मोठी बातमी! मुलासाठी राणेंनी सोडले राजकारण, म्हणाले, ‘मला आता विश्रांतीची गरज आहे’