Homeखेळअनुष्का शर्माला ‘मम्मा मम्मा’ म्हणताना दिसली वामिका, चाहतेही झाले खुश; पहा मायलेकींचा...

अनुष्का शर्माला ‘मम्मा मम्मा’ म्हणताना दिसली वामिका, चाहतेही झाले खुश; पहा मायलेकींचा खास व्हिडिओ

विराट कोहली सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. तो कुठेही गेला तरी त्याला कुटुंबासोबत जायला आवडते. अनुष्का आणि छोटी वामिका नेहमीच त्याच्यासोबत या दौऱ्याचा भाग असतात. नववर्षानिमित्त विराट आपल्या कुटुंबासोबत आहे. तो कुटुंब आणि भारतीय क्रिकेट संघासोबत नवीन वर्ष साजरे करत आहे.

अशात अनुष्का आणि त्याच्या मुलगी वामिका व्हिडिओ समोर आला आहे, जो नवीन वर्षाच्या निमित्ताने चाहत्यांसाठी एखाद्या गिफ्टपेक्षा कमी नाही. अनुष्काने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीची मुलगी तिला मम्मा म्हणताना दिसत आहे.

अनुष्का शर्माने न्यू इयर पार्टी सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यातील एक व्हिडिओ असा आहे ज्यामध्ये वामिका तिला आई म्हणताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये वामिका कुठेही दिसत नसली तरी तिचा आवाज स्पष्ट ऐकू येत आहे. वामिकाचा गोंडस आवाज ऐकून खरोखरच कोणाचाही दिवस आनंदात जाईल.

या खास प्रसंगी अनुष्का आणि विराटने त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अनुष्काने विराटसोबतचे न्यू इयर सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये दोघेही मोठा केक कापताना दिसत आहेत. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, या वर्षाने आम्हाला जगातील सर्वात मोठा आनंद दिला आहे. २०२१ सालासाठी मी सदैव ऋणी राहीन. धन्यवाद.

https://www.instagram.com/reel/CYJvU0RvesE/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading

या खास प्रसंगी चाहतेही या जोडप्याला शुभेच्छा देत आहेत. त्याचवेळी काही चाहते विचारताना दिसले की वामिकाने अनुष्काला मम्मा म्हणून हाक मारली आहे, पण ती विराट कोहलीला पापा कधी म्हणणार? आतापासूनच चाहते त्या व्हिडिओची वाट पाहत आहेत.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत या जोडप्याने ख्रिसमसचा सणही साजरा केला होता. भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेत कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळत आहे. भारताने पहिला कसोटी सामना मोठ्या फरकाने जिंकला, आता जगभरातील लोकांच्या नजरा दुसऱ्या कसोटी सामन्याकडे लागल्या आहेत. कारण भारताने दुसरा कसोटी सामना जिंकला तर ते मालिका जिंकतील आणि इतिहासात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत जाऊन कसोटी स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ असेल.

महत्वाच्या बातम्या-
मंदिराच्या दानपेटीत कंडोम टाकून पळून जायचा ६२ वर्षांचा व्यक्ती; कारण ऐकून पोलिसांनाही बसला धक्का
मोठी बातमी! मुलासाठी राणेंनी सोडले राजकारण, म्हणाले, ‘मला आता विश्रांतीची गरज आहे’
माझ्याशी संबंध ठेव म्हणत बळजबरी करत होता ठेकेदार, संतापलेल्या महिलेने उचलले ‘हे’ धक्कादायक पाऊल