Share

उल्कापिंड की सॅटेलाईट? महाराष्ट्रात दिसलेला ‘तो’ आगीचा गोळा नक्की कशाचा?

शनिवारी राज्यातील आकाशात एक रहस्यमय गोष्टी दिसून आली. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील अनेक भागात लोकांनी आकाशात रहस्यमयी आगीचा गोळा बघितला आहे. तसेच या आगीच्या गोळ्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (people seeing chinese satelite)

या आगीच्या गोळ्याने अनेकजण हैराण झाले आहे. तसेच ते उल्कापिंड आहे की उपग्रह असा प्रश्न सर्वांना पडला होता. तसेच अनेकांनी तर काहीतरी वेगळाच प्रकार असल्याचेही म्हटले होते. त्यानंतर लोकांनी याचे व्हिडिओ आणि फोटो काढायला सुरुवात केली, त्यांनी ते सोशल मीडियावर शेअर केलेत.

आता त्यावर खगोलशास्त्रज्ञांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे उल्का नसून उपग्रहाचे तुकडे असू शकतात. जे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करत असताना जळत होते, असे म्हटले आहे. अशात एका अमेरिकन शास्त्रज्ञाने दावा केला आहे की, हे चिनी रॉकेटचे भाग होते.

आकाशात दिसणाऱ्या हे दृश्य महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, अकोला, जळगाव आदी जिल्ह्यांत पाहायला मिळाले आहे. तर त्याचवेळी ते मध्य प्रदेशच्या झाबुओ, खरगोन आणि बरवानी जिल्ह्यातील अनेक लोकांनी आकाशात हे दृश्य पाहिल्याचा दावा लोकांनी केला आहे.

जोनाथन मॅकडॉवल या अमेरिकन शास्त्रज्ञानं ट्विट केलं आहे की, मला वाटतं की हे चीनचे रॉकेट चेंग झेंग ३ बी होते, जे पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करत होते. हे रॉकेट गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये प्रक्षेपित करण्यात आलं होतं. पृथ्वीच्या दिशेने परत येत असताना, वातावरणाच्या संपर्कात आल्यानं त्याचे भाग जळथ होत.

नागपूरातील स्कायवॉच ग्रुपचे चेअरमन सुरेश चोपडे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. ते म्हणाले, या तेजस्वी रेषा उल्का पावसाशी संबंधित असण्याची शक्यता खुपच कमी आहे. कारण त्यातून रंगीबेरंगी दिवे बाहेर पडत होते. जेव्हा त्या गोष्टीमध्ये धातूची वस्तु असते, तेव्हाच असे रंग दिसतात. त्यामुळे कुठल्यातरी देशाचा उपग्रह चुकून खाली पडला असावा किंवा जाणूनबुजून हे काम केले असावे.

महत्वाच्या बातम्या-
भारताच्या ‘या’ स्टेशनवर जाण्यासाठी लागतो व्हिसा; नियम पाळले नाही, तर थेट टाकतात तुरुंगात
मनसे मेळाव्यावर सेनेची जहरी टीका; ‘राज ठाकरेंच्या तुंबलेल्या मोरीतून भाजपचे गांडूळ निघाले’
पत्नी परपुरुषाच्या मिठीत पाहून पतीला आला राग; मात्र पुढे कहाणीत आला ‘असा’ ट्विस्ट; वाचून थक्क व्हाल

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now