Share

Zarkhand: लोकं कपडे, रेशन, खरेदी करतो पण भाजप आमदार खरेदी करत आहे, मुख्यमंत्र्यांचा सणसणीत टोला

Hemant Soren

झारखंड(Zarkhand): झारखंडच्या राजकीय उलथापालथीमुळे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आमदारकी धोक्यात आली होती. आता झारखंडच्या राजकारणाची सध्या मोठी बातमी समोर आली आहे, जिथे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. झारखंड विधानसभेत हेमंत सोरेन यांच्या बाजूने ४८ मते पडली आणि विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात एकही मत पडले नाही.

प्रत्यक्षात विश्वासदर्शक ठरावासाठी मतदान सुरू होण्यापूर्वीच भाजप आमदारांनी सभागृहातून वॉक आऊट केले. त्याचवेळी विधानसभा अध्यक्षांच्या सूचनेनंतर सभागृहात विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. सभागृहात विश्वासदर्शक ठराव मांडण्यावरही चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

हेमंत सोरेन म्हणाले की, भाजपला फक्त सत्ता हवी आहे, भाजपला विकासाची चिंता नाही. सभागृहात भाषण करताना हेमंत सोरेन यांनी भाजपवर अनेक आरोप केले. ते म्हणाले की, भाजप घोडेबाजार करतो, भाजप सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. विधानसभेत सभापतींनी विरोधकांना विश्वासदर्शक ठरावावर चर्चा करण्यास सांगितले.

मी प्रत्येकावर भाष्य करत बसलो तर, हे अधिवेशनही कमी पडेल असे ते म्हणाले. “आम्ही लोक कपडे, रेशन, किराणा सामान खरेदी करत असल्याचं ऐकलं आहे. पण फक्त भाजपच आमदार खरेदी करत आहे,” असा आरोप त्यांनी केला. झारखंड विधानसभेचे विशेष अधिवेशन सोमवारी बोलावण्यात आले आहे. सकाळी 11.15 वाजता सभागृहाचे कामकाज सुरू झाले.

कामकाज सुरू होताच हेमंत सरकार यांनी सभागृहात विश्वासदर्शक ठराव मांडला. यानंतर सभापती रवींद्रनाथ महतो यांनी सत्ता आणि विरोधकांना बोलू दिले. त्यानंतर विरोधी पक्षाचे आमदार नीलकंठ सिंह मुंडा म्हणाले की, हेमंत सरकार किती मजबूत आहे हे झारखंड राज्यातील जनता पाहत आहे. झारखंडमधील सत्ताधारी यूपीए आघाडीचे जवळपास 30 आमदार रायपूरला गेले होते.

सोमवारी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सहभागी होण्यासाठी रविवारी दुपारी रांचीला परतले. या आमदारांना ३० ऑगस्टपासून रायपूरजवळील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते. या सर्व आमदारांबरोबर काल (रविवारी) संध्याकाळी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विश्वास ठरावाबाबत चर्चाही केली होती.

महत्वाच्या बातम्या
Bollywood: जान्हवीच्या शॉर्ट्समधील फोटोंनी घातला सोशल मीडियावर धुमाकूळ, लोकं म्हणाली, कोणी एवढं सुंदर कसं असू शकतं
…त्यामुळे शिवाजी पार्कचा दसरा मेळावा एकनाथ शिंदेंचाच झाला पाहिजे; आठवलेंनी सांगीतले कारण
आम्ही पक्षातून लोकं फोडतो तसे इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी फोडा आणि…; गुलाबरावांचा शिक्षकांना अजब सल्ला
Amit Shah: अमित शहांच्या आग्रहापुढे अखेर एकनाथ शिंदेंना झुकावेच लागले; वाचा नेमकं काय घडलं

राजकारण इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now