Share

शॉर्ट कपडे घातल्यामुळे तरुणींना सहा लोकांनी केली चप्पलने मारहाण, पुण्यातील धक्कादायक घटना

राज्यात महिला अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहे. असे असताना आता पुण्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. पुण्यात काही मुलींना शॉर्ट कपडे घातल्यामुळे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरातून संताप व्यक्त केला जात आहे. (people beat girls because of short dress)

शॉर्ट कपडे घातल्यामुळे काही लोकांनी तरुणींना मारहाण केली आहे. आरोपीने पीडित मुलींना चप्पलने मारहाण केली आहे. या प्रकरणी तरुणींनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी मारहाणीसह अन्य कलमांतर्गत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा धक्कादायक प्रकार चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रक्षक नगर परीसरात घडला आहे. संबंधित तरुणी या खराडी येथील रक्षकनगर परीसरात पेइंग गेस्ट म्हणून राहतात.

त्या तरुणी वेगवेगळी कंपनीत काम करतात. त्या परीसरात शॉर्ट कपडे घालून फिरतात. या कारणामुळे आरोपींनी त्यांना चप्पलने मारले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परीसरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर घरमालिकीणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

तक्रार देणाऱ्याने महिलेने म्हटले की, संबंधित आरोपी हे नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींवरुन वाद घालत असतात. यावेळी त्यांनी पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणींच्या कपड्यांवरुन वाद घालायला सुरुवात केली. बुधवारी रात्री काही आरोपी त्यांच्या घरी आले होते आणि त्यांनी मुली शॉर्ट कपडे घालून परीसरात फिरतात असा आरोप केला होता. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. या वादात आरोपींनी तरुणींना चप्पले मारहाण केली.

त्यानंतर घरमालकीणीने चंदननगर पोलीस ठाण्यात संबंधित लोकांविरोधात तक्रार दाखल केली. ४४८, २३२, ५०४, ५०६, १४३, १४७, १४९ अंतर्गत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परीसरात एकच खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या-
लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर महिला अधिकारी म्हणाली, हे फक्त माझ्या एकटीसाठी नाही, तर..
मोठी बातमी! सोनाक्षी सिन्हा विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी, वाचा संपूर्ण प्रकरण
अमेरिकन शेअर्समधून भारतीय गुंतवणूकदार करणार मोठी कमाई, शेअर बाजाराने सुरु केली ‘ही’ सुविधा

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now