१५ बॉलात ५६ रन कसे काढले? एकाच ओव्हरमध्ये सामना पलटवणाऱ्या पॅट कमिन्सने सांगितले रहस्य; म्हणाला…

आयपीएल २०२२ च्या १४ व्या सामन्यात कोलकाता नाईट आणि मुंबई इंडियन्स यांच्यात जबरदस्त सामना पाहायला मिळाला. या सामन्यात पॅट कमिन्सने १५ चेंडूत नाबाद ५६ धावांची तुफानी खेळी केली. IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत अर्धशतक ठोकणारा तो दुसरा खेळाडू बनला आहे. (pat cummins fastest fifty secret)

मुंबई इंडियन्सविरुद्ध आक्रमक खेळी केल्यानंतर आता त्याने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, मी विक्रमी खेळी खेळू शकलो यावर विश्वास बसत नाही. माझी खेळी पाहून मलाच धक्का बसला. त्याच्या खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने पाच वेळचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सचा ५ गडी राखून पराभव केला.

केकेआरचा ४ सामन्यांमधला हा तिसरा विजय आहे. त्याचबरोबर मुंबईचा हा सलग तिसरा पराभव आहे. कमिन्सने या डावात चार चौकार आणि सहा षटकार मारले. म्हणजेच त्याने चौकार आणि षटकार मारुनच ५२ धावा केल्या. त्याने अवघ्या १४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्सच्या एका षटकात ३५ धावा ठोकल्या.

सामनावीर ठरल्यानंतर पॅट कमिन्स म्हणाला, ‘मला या खेळीचे अधिक आश्चर्य वाटते. मला बॉल फक्त हवेत तरंगताना दिसत होता. मी जास्त विचार करत नव्हतो. हे खरोखर समाधानकारक आहे. तो म्हणाला की, मी बाऊंड्रीकडे शॉट खेळण्याचा प्रयत्न करत होतो. मी भाग्यवान आहे की संघाने मला त्यांच्यासोबत ठेवले आहे. केकेआरने १६२ धावांचे लक्ष्य अवघ्या १६ षटकांत पूर्ण केले.

यावर संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, मी फक्त हवेत बॉल फिरताना पाहत होतो. माझा विश्वासच बसत नव्हता. ही त्याची अप्रतिम खेळी होती. आम्ही आमची रणनीती अंमलात आणण्यापूर्वीच पॅटने सामना संपवला. पॅट कमिन्सची खेळी खरंच जबरदस्त होती.

कमिन्सच्या खेळीने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माही हैराण झाला. रोहित म्हणाला की, मला त्याच्याकडून अशा खेळीची अपेक्षा नव्हती. तो ज्या पद्धतीने खेळला त्याचे संपूर्ण श्रेय त्याला जाते. आमची फलंदाजी चांगली झाली नाही. १५ व्या षटकापर्यंत आम्हाला असे वाटत होते की आम्ही सामना जिंकू, पण कमिन्सने सर्व सामनाच पलटला.

महत्वाच्या बातम्या-
मुलीच्या लग्नासाठी नव्हते पैसे, आईने रचलं थरारक कारस्थान; वाचून बसेल जबर धक्का
VIDEO: मालकासाठी नव्हे तर ‘या’ साठी 8 KM रुग्णवाहिकेच्या मागे धावला घोडा; कारण वाचून रडालं
अंगठे बहादूर महिलेनी केली कमाल! स्ट्रॉबेरी शेतीतून कमवित आहे लाखो रुपये; महिलांसाठी बनली एक प्रेरणास्रोत