Share

“संभाजीराजेंना राज्यसभेवर पाठवले पाहिजे, त्यांना मान खाली घालायला लावू नये”; राजेंसाठी पंकजा मुंडे मैदानात

शिवसेनेने राज्यसभेच्या जागेसाठी कोल्हापूरचे शिवसेना नेते संजय पवार यांची घोषणा केली आहे. या जागेवर शिवसेना संभाजीराजे यांना पाठवेल अशी चर्चा होती. पण अचानक शिवसेने संजय पवारांची निवड केली आहे. त्यामुळे संभाजीराजेंना डावलून शिवसेनेने संजय पवारांना ही राज्यसभेची उमेदवारी दिली आहे, असे म्हटले जात आहे. (pankaja munde support sambhajiraje)

संभाजीराजेंना उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजप नेते ठाकरे सरकारवर निशाणा साधताना दिसून येत आहे. काही नेते ठाकरे सरकारवर आरोपही करत आहे. आता याप्रकरणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनीही शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

उदयनराजे भोसले यांच्या बाबतीत जी भूमिका आघाडी सरकारने घेतली होती. तिचं आम्ही स्वागत केलं होतं. आम्ही एका छत्रपतींना राज्यसभेवर पाठवलं होतं. तुम्ही दुसऱ्या छत्रपतींना राज्यसभेवर पाठवा. संभाजीराजे छत्रपती आहेत, त्यांना मान खाली घालायला लावू नये, असा निर्णय घ्यायला पाहिजे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

पुढे ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, लोकांना गोड वाटेल अशा घोषणा करायच्या आणि त्यातून आपणही लोकप्रिय व्हायचं अशा पद्धतीचे राजकारण ओबीसीच्या संदर्भात झालंय. ओबीसी आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजे.

मध्य प्रदेश सरकारने जे केलं ते पाहण्यासाठी सरकारने आपली लोकं मध्य प्रदेशात पाठवावी. त्याचा अभ्यास करावा आणि त्या पद्धतीने महाराष्ट्रात देखील ओबीसीला आरक्षण मिळवून द्यावे. अशी माझी भूमिका आहे. यात मी सरकारला मदत करायलाही तयार आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

एम्पिरियल डेटा आणि जातीय जनगणना हा विषय वेगळा आहे. जातीय जनगणनावर आरक्षण मिळत नाही, हे शरद पवारांना कोणीतरी चुकीचं सांगितलं असेल. त्या समाजातील लोक किती मागासलेले आहे, त्यावरुन आरक्षण ठरतं. त्यामुळे ओबीसी हा मागासलेला समाज अजून त्याला आरक्षण गरजेचं आहे, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
IPL स्पर्धेतून बाहेर पडताच सुट्टी सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा, पत्नीसोबतचे रोमॅंटिक फोटो व्हायरल
एकेकाळी वेबसिरीजमधील बोल्ड भूमिकांवर टिका करणारी प्राजक्ता माळी आता मात्र स्वताच…
पुणे हादरलं! प्रियकरासोबत मिळून आपल्याच पोटच्या बाळाला कोंबलं शौचालयाच्या भांड्यात

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now