Share

भाजपने डावलल्यानंतर पंकजा मुंडे शिवसेनेत जाण्याच्या तयारीत?

Pankaja Munde

सध्या राजकीय वर्तुळात घडणाऱ्या घडामोडींमुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यसभा निवडणूकीसोबतच विधानपरिषदेचीही चर्चा सुरु आहे. विधानपरिषदेच्या निवडणूकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी प्रत्येकी दोन उमेदवारांना रिंगणात उतरवलं आहे. (pankaja munde shiseva)

तसेच भाजपनेही त्यांच्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय आणि पाचव्या जागेवर उमा खापरे असणार आहे. या सर्वांना उमेदवारी भेटली पण पंकजा मुंडे यांना उमेदवारी न भेटल्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या त्यांचीच चर्चा सुरु आहे.

तसेच महाविकास आघाडीतून त्यांना ऑफर येत असल्याचीही चर्चा आहे. पंकजा मुंडे यांना डावलल्यामुळे त्यांचे समर्थकही नाराज झालेले आहे. औरंगाबादमध्ये तर समर्थकांनी भाजपविरोधात घोषणाबाजीही केली. काहींनी तर भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा ताफा आडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनीच त्यांना अडवलं.

भाजपचे नेतेही पंकजा मुंडे नाराज असल्याचे म्हणत आहे, पण पंकजा मुंडे यांनी मात्र त्यावर अजूनही मौन बाळगलेलं आहे. त्यामुळे त्या यावरुन नाराज असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अशात गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्या भविष्याची काळजी करु नका, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केले होते.

सध्या पंकजा मुंडे पुढे काय करणार अशीही चर्चा रंगली आहे. असे असतानाच अर्जून खोतकर यांनी शिवसेनेची दारं त्यांच्यासाठी खुली असल्याचे म्हटले होते. पंकजा मुंडे आपल्या बहिणीसारख्या आहे. त्या जेव्हा भेटतील तेव्हा शिवसेनेतील प्रवेशाचा विषय नक्की काढू, असे खोतकर यांनी म्हटले होते.

विधान परिषदेची उमेदवारी न दिल्यामुळे पंकजा मुंडेंचे समर्थक आधीच भाजपवर संतापलेले आहे. पण अजूनही पंकजा मुंडे यांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. त्यामुळे ही वादळापूर्वीची शांतता असल्याचेही म्हटले जात आहे. त्यामुळे आता पुढे नक्की काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

महत्वाच्या बातम्या-
“मला खासदार बनवण्यात शिवसेनेचा ५०% वाटा, फडणवीसांनी सांगीतलं तरी सेनेला एकटं सोडणार नाही”
राज्यसभेच्या निकालाच्या दिवशी काय झालं होतं मला माहितीये, त्यारात्री…; संजय राऊतांनी केले गंभीर आरोप
पैगंबरांचा अपमान करणाऱ्या नुपूर शर्माला महाराष्ट्रातून दणका; भिवंडी पोलिसांची मोठी कारवाई

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now