भाजपमध्ये पंकजा मुंडेंना अनेकदा डावललं जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्या नाराज झाल्याच्याही दिसून आले आहे. आता पुन्हा एकदा त्या नाराज असल्याच्या बातम्या येत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
मध्यंतरी पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती. त्यानंतर ठाकरे गटातील आमदाराने पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. त्यामुळे पंकजा मुंडे पक्ष सोडणार असल्याची चर्चाही होत होती.
आता पंकजा मुंडे यांनी अखेर यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजपला सोडण्याच्या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहे. मी भाजपच्या कुशीत वाढलेली आहे. मी खरीखुरी कार्यकर्ता आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
भाजप आणि मुंडे साहेब यांना कधीही वेगळं करता येणार नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. तसेच भाजप म्हणजे फक्त एक व्यक्ती नाही, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
मी पक्षावर नाराज नाही. मी पक्षाची खरीखुरी कार्यकर्ता आहे. मी पक्षाचे सर्व प्रोटोकॉल सुद्धा पाळते, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. शिक्षक मतदार संघाचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे बीडमधील गेवराईच्या एका सभेला आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी असे म्हटले आहे.
पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे आपण नाराज नसल्याचे म्हटले असले तरी त्यांची नाराजी अनेकदा स्पष्टपणे दिसून आली आहे. फडणवीस हे गेल्या आठवड्यात बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पंकजा मुंडे या गैरहजर होत्या. त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या-
समृद्धी ठरतोय मृत्यूचा महामार्ग! भीषण अपघातात बसचा चक्काचूर; पाहून अंगावर काटा येईल
अहंकारात राख झाला पाकिस्तान! भारताशी शत्रुत्व पडले भारी, गेल्या ७० लाख लोकांच्या नोकऱ्या; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
जिच्या प्रेमात सना तिचे लिंग बदलून साहिल बनली, तिनेच केला विश्वासघात; आता म्हणतेय…