Share

मला असं वाटतं, सर्वांनी माझ्या पात्राचा तिरस्कार करावा; ‘द काश्मीर फाइल्स’ची अभिनेत्री अशी का म्हणाली?

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान, या चित्रपटात अतिशय आव्हानात्मक भूमिका साकारणारी विवेकची पत्नी पल्लवी जोशीने तिच्या भूमिकेबद्दल सांगितले. (pallavi joshi statement on the kashmir files)

पल्लवीने सांगितले की, तिने हे पात्र अशाप्रकारे साकारले आहे, ज्यामुळे भारताचा प्रत्येक नागरीक तिच्या या पात्राचा तिरस्कार करेल. जेव्हा आम्ही काश्मिरी पंडितांकडून या आघाताची माहिती गोळा करत होतो, त्याच वेळी आम्हाला समजले की लोक खलनायकाच्या पात्रात कोण पाहत आहेत.

तसेच ही व्यक्तिरेखा अशा प्रकारे साकारणार आहे की देशातील प्रत्येक नागरिक तिचा तिरस्कार करेल. काश्मीर हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग कधीच नव्हता आणि ही वस्तुस्थिती आहे. जर भारत इंग्रजांपासून आपल्या स्वातंत्र्यासाठी लढू शकतो तर काश्मीर का नाही? असेही पल्लवीने सांगितले आहे.

पल्लवीने यापूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्याविरोधात फतवा काढण्यात आला होता. पल्लवी म्हणाली, शूट दरम्यान एक गोष्ट घडली की, आम्ही जेव्हा काश्मीरमध्ये चित्रपटाचे शूटिंग करत होतो. तेव्हा आमच्या नावाने फतवा काढण्यात आला होता. सुदैवाने जेव्हा आमच्या नावाने फतवा निघाला तेव्हा आम्ही आमच्या शेवटच्या सीनचे शूटिंग करत होतो.

या फतव्याबाबत मला हे सगळं कळल्यावर मी विवेकला म्हटलं, चला लवकर हा सीन संपवून एअरपोर्टला निघू. त्यानंतर आम्ही निघालो होतो, त्यावेळी मी विवेकला म्हणाले, काही बोलू नकोस आणि फक्त शूट पूर्ण कर, कारण मग पुन्हा आपल्याला इथे येण्याची संधी मिळणार नाही, असेही पल्लवीने मला सांगितले.

पल्लवी पुढे म्हणाली, आम्ही तो सीन खूप लवकर संपवला आणि मी काही लोकांना हॉटेलमध्ये पाठवले. त्यांना आम्ही सांगितले की तुम्ही पॅकिंग सुरू करा. सर्व काही बॅगमध्ये ठेवा आणि सेटवर या. आपण तिथूनच निघू. अशाच अनेक गोष्टी आम्हाला शुटींगच्यावेळी अडचण ठरत होत्या.

पल्लवीने चित्रपटात जेएनयू प्रोफेसर राधिका मेननची भूमिका साकारली आहे. या चित्रपटानुसार राधिकाने विद्यार्थ्यांना स्वतंत्र्य काश्मीरसाठी लढण्यासाठी प्रेरित केले होते. विवेक रंजन अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटात पल्लवी जोशी व्यतिरिक्त अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, प्रकाश बेलावाडी, दर्शन कुमार, भाषा सुंबली, पुनीत इस्सार हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत.

महत्वाच्या बातम्या-
सतत हिजाब घालणाऱ्या इरफान पठाणच्या पत्नीचा चेहरा अखेर आला समोर; तिची सुंदरता पाहून चाहते घायाळ
दिल्लीतून आलं पत्र, युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत यांची निवड
प्रत्येक सीननंतर चिन्मय मांडलेकरला द्याव्या लागत होत्या ‘भारत माता की जय’ च्या घोषणा, कारण वाचून अवाक व्हाल

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now