Share

आजा ना राजा! पाकिस्तानच्या रेस्टॉरंटने आलियाच्या ‘त्या’ व्हिडीओचा जाहिरातीसाठी केला वापर, नेटकरी संतापले

बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्टने संजय लीला भन्साळीच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात आलियाने सेक्स वर्करची भूमिका साकारली होती. या चित्रपटाशी संबंधित एक क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, जी पाकिस्तानमधील कराची येथील एका रेस्टॉरंटने जाहिरातीसाठी वापरली आहे. रेस्टॉरंटच्या लाजीरवाण्याकृत्यामुळे लोकांनी संताप व्यक्त केला आहे. (pakistani restaurant use alia video for advertisement)

बॉलीवूडचा सुपर-डुपर हिट चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ मधील एका सीनची पाकिस्तानी रेस्टॉरंटने चोरी केली आहे. ज्याचा वापर ते त्यांच्या रेस्टॉरंटच्या जाहिरातीसाठी करत आहे. एवढेच नाही तर सीनच्या माध्यमातून पुरुषांना खास ऑफर्सही दिल्या जात आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे.

व्हिडिओ क्लिपमध्ये, आलिया भट्ट कोठ्याच्या दारात उभी आहे आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हातवारे करत आहे. आता हा सीन पाकिस्तानी रेस्टॉरंट ग्राहकांना बोलावण्यासाठी वापरत आहे. व्हिडिओमध्ये कोठ्याच्या भिंतीवर पाकिस्तानी रेस्टॉरंटचे मोठे पोस्टर दाखवण्यात आले आहे. हे पाहून लोकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

कराचीमधील हे रेस्टॉरंट पुरुषांसाठी खास २५% डिस्काऊंटची ऑफर घेऊन आले आहे. रेस्टॉरंटने सोमवारी हा व्हिडिओ शेअर केला, ज्यानंतर इंटरनेटवर चांगलाच वाद सुरू झाला आहे. पाकिस्तानी रेस्टॉरंटच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

https://www.instagram.com/p/Ce5f2gVooJJ/?utm_source=ig_embed&ig_rid=a9bad0bc-35be-4c6d-bd2f-8dcbbd49ed3b

पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आजा ना राजा, कोणाची वाट पाहत आहे?’ त्यामुळे व्हिडिओवर बरीच टीका होत आहे. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने लिहिले की, जाहिरातीसाठी वाईट दृश्य वापरणे मूर्खपणाचे आहे, तर दुसर्‍या इंस्टाग्राम वापरकर्त्याने म्हटले आहे की, ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्याची तुमची पद्धत खूपच वाईट आहे.

रेस्टॉरंटने लोकांच्या नाराजीबद्दल आणि आपल्या असभ्यपणाबद्दल माफी मागितली नाही, तर एक पाऊल पुढे जाऊन स्वतःचा बचाव केला आहे. इंस्टाग्रामवर आलिया भट्टचा फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिले की, अरे तुम्ही हे इतके मनावर का घेताय चित्रपट केला तर आग आणि जाहिरात केली तर पाप?’ ही फक्त एक संकल्पना आहे. आम्हाला कोणाला दुखवायचे नाहीये.

महत्वाच्या बातम्या-
तो अभिनेता आणि ती भिती…; प्रसिद्ध अभिनेत्रीचा रामदेव बाबांसमोर हैराण करणारा खुलासा
कौतुकास्पद! मेंढ्या चारून १० वीत पाडले तब्बल ९२ टक्के, पडळकरांनीही केले कौतुक, म्हणाले…
दारूच्या नशेत पत्नीचा केला खून नंतर गेला विसरून, मृतदेहासोबतच झोपला, सकाळी उठला अन्…

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now