सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात काय सुरू आहे हे कोणालाही सांगायची गरज नाही. पुर्ण देशात या बंडखोरीची चर्चा सुरू आहे. यामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असलेले नाव कोणते असेल तर ते एकनाथ शिंदे. आता सध्या सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. सत्ता परिवर्तन होणार का?
सत्ता परिवर्तन झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार? असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत. यामध्येच आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेसोबत बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे यांच्या नावाचा डंका पुर्ण जगात झाला आहे. एकनाथ शिंदे नक्की कोण आहेत? हे सगळ्यांना जाणून घ्यायची उत्सुकता आहे.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की पाकिस्तानमध्ये सगळ्यात जास्त नाव एकनाथ शिंदेचे सर्च करण्यात आले आहे. पाकिस्तानपाठोपाठ सौदी अरेबिया, थायलंड, कॅनडा, नेपाळ, मलेशिया, बांगलादेश आणि जपान या देशांचा नंबर आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसांपासून पाकिस्तानमधील ५० टक्के लोक एकनाथ शिंदे यांच्याबद्दल गुगलवर सर्च करत आहेत.
एकनाथ शिंदे यांचं नाव सध्या जगात इतक्या वेळा सर्च केलं जात आहे की त्यांनी उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांनाही मागे टाकले आहे. सौदी अरेबियामध्ये जवळपास ५३ टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांचं नाव सर्च केलं आहे. जगभरात आतापर्यंत सर्वात जास्त ५ नेत्यांबद्दल सर्वात जास्त सर्च करण्यात आलं.
यामध्ये सगळ्यात वरती एकनाथ शिंदे यांचे नाव आहे. त्यामध्ये पाकिस्तानमध्ये ५४ टक्के, सौदी अरेबियात ५७ टक्के, मलेशियामध्ये ५१ टक्के आणि नेपाळमध्ये ५१ टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांना गुगलवर सर्च केलं आहे आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामध्ये एकनाथ शिंदे कोण आहेत? त्यांचे सध्याचे पद कोणते आहे? त्यांनी महाविकास आघाडी सरकारला गुडघ्यावर कसं आणलं? एक रिक्षाचालक असलेले एकनाथ शिंदे मंत्री कसे झाले? असे अनेक प्रश्न गुगलवर सर्च केले जात आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना, उद्धव ठाकरे, भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलही लोकांनी सर्च केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर भाजपने टाकला पहिला डाव; राज्यपालही रणांगणात
बंडखोर नेते एकनाथ शिंदेंची संपत्ती वाचून अवाक व्हाल; ठाण्यात दोन बंगले, ७० लाखांच्या गाड्या…
VIDEO: मुंबईच्या या फलंदाजाने सिद्धू मुसेवालाला वाहिली अनोखी श्रद्धांजली, मैदानावरच कोसळले रडू
शिंदेंना मोठा झटका! चौधरींच्या गटनेतेपदाला विधानसभा उपाध्यक्षांची मान्यता; ‘त्या’ १२ जणांची आमदारकी रद्द होणार?