पाकिस्तानातील सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यात सोमवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी एका हिंदू व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या केली. सुतान लाल देवाण असे हत्या करण्यात आलेल्या हिंदू व्यावसायिकाचे नाव होते. त्याला जीवेमारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. याबाबत सुतानने पोलिसांकडे तक्रार केली होती, पण पाकिस्तानी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. (pakistani kill hindu man)
अखेर हल्लेखोरांनी सुतानला जगायचे असेल तर भारतात जा, अशी धमकी दिली आणि त्याची हत्या केली. पाकिस्तानमध्ये मरण पावलेल्या सुतानने मातृभूमी सोडून कुठेही जाणार नसल्याचे सांगितले होते. पाकिस्तानी वृत्तपत्र फ्रायडे टाईम्सच्या वृत्तानुसार, सुतान एका कापड कारखान्याचे उद्घाटन करून परतत असताना वाटेत त्याच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात त्याचा एक नातेवाईक हरीश कुमार जखमी झाला असून त्याला रहिमयार खानच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
व्यावसायिकाच्या जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याची ही दुसरी वेळ होती. या हल्ल्यात जखमी झालेल्या सुतान लालचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या व्हिडिओमध्ये सुतान लाल आपल्यावर हल्ला झाला असून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत आहे.
जमिनीच्या वादातून पुतण्या आणि इतर चार जणांनी आपल्यावर हल्ला केल्याचे त्याने सांगितले होते. ते सतत धमक्या देत होते. सुतानने सांगितले होते की, हल्लेखोरांनी मला जगायचे असेल तर पाकिस्तान सोडून भारतात चालल्या जा असे सांगितले होते. पण मी पाकिस्तान सोडणार नाही आणि जन्मभूमी सिंधमध्ये मरणे मला आवडेल.
आपल्याला मिळणाऱ्या धमक्यांबाबत पोलिसांना अनेकवेळा सांगितले, पण कारवाई झाली नाही, असे सुतानने सांगितले होते. या हत्याकांडानंतर स्थानिक हिंदू आणि मुस्लिम समाजाने डहरकी पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली. मारेकऱ्यांना तातडीने अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
व्यापाऱ्याच्या हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण शहरात दुकाने बंद होती. पाकिस्तानचा विरोधी पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज गटाने या हत्याकांडाचा निषेध केला असून एका ख्रिश्चनच्या हत्येनंतर आता एका हिंदू नागरिकाची हत्या करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ फेम अंजली भाभी पैशांसाठी करायची ‘हे’ काम, स्वत:च केला होता खुलासा
द्रविड-सचिनच्या मुलानंतर ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूच्या मुलानं गाजवलं मैदान, शतक ठोकत संघाला मिळवून दिला विजय
‘त्या’ चित्रपटादरम्यान महिमा चौधरीसोबत घडली होती भयानक घटना, पूर्ण करिअरच झाले उद्ध्वस्त