Share

PAK vs AFG : भारतासोबत अफगानिस्तानही फायनलमधून बाहेर, हायव्होल्टेज मॅचमध्ये पाकिस्तानचा विजय

PAK vs AFG | आशिया चषकाच्या सुपर 4 च्या या सामन्यात पाकिस्तानने रोमहर्षक सामन्यात 130 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा 1 गडी राखून पराभव केला. नसीम शाहने फजलहक फारुकीला लागोपाठ दोन षटकार ठोकून सामना संपवला. या सामन्यात अफगाणिस्तानने मोठे आव्हान उभे केले होते.

फझलहक फारुकीने 18व्या षटकात दोन बळी घेत सामन्याचा रंग बदलला. 50 धावांपूर्वीच पाकिस्तानने 3 विकेट गमावल्या होत्या, परंतु शादाब खान आला आणि त्याने काही मोठे शॉट्स खेळले आणि पाकिस्तानने सामन्यात पुनरागमन केले. अफगाणिस्तानसाठी, मुजीब उर रहमान आणि राशिद खान यांनी पाकिस्तानच्या फलंदाजांसमोर जबरदस्त गोलंदाजी केली होती.

मुजीब उर रहमानने पहिल्या तीन षटकात केवळ 5 धावा दिल्या होत्या. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने अप्रतिम गोलंदाजी करत अफगाणिस्तानला 129 धावांत रोखले. बाबर आझम शून्य धावांवर बाद झाला.  या सामन्यात अफगाणिस्तानने विजय मिळवावा अशी भारतीय चाहत्यांची इच्छा होती.

भारतीय चाहत्यांच्या नजरा या सामन्याकडे खिळल्या होत्या. अंतिम फेरीत पोहोचण्याच्या भारताच्या आशांवर आता पाणी फेरले गेले आहे. आता पाकिस्तान आणि श्रीलंका अंतिम फेरीत गेले आहेत. तर अफगानिस्तान अंतिम फेरीतून बाद झाला आहे. आज अफगानिस्तानसोबत भारतीय चाहत्यांच्याही हाती निराशा आली आहे.

शेवटच्या काही काळात वातावरण तापले होते. पाकिस्तानी खेळाडू असिफ अलीने अफगानिस्तानच्या बाॅलरला धक्काबुक्की केली. त्याने त्याच्यावर बॅटही उगारली होती. काही वेळासाठी वातावरण तापले होते पण बाकीच्या खेळाडूंनी मध्यस्ती करून वातावरण शांत केले.

दरम्यान, भारतीय चाहत्यांचे मन मात्र अफगानिस्तानच्या खेळाडूंनी जिंकले आहे. अफगानिस्तानच्या खेळाडूंनी खुप प्रयत्न केले जिंकण्यासाठी पण त्यांच्या हाती निराशा आली. भारतीय चाहत्यांच्या आशाही त्यांच्यावरच अवलंबून होत्या पण त्यांचा खेळ पाहून कोठेतही भारतीय चाहत्यांना समाधान झाले. सोशल मिडीयावर भारतीय चाहत्यांनी अफगानिस्तानचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं.

महत्वाच्या बातम्या
रोहित शर्मामुळे ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांच्यात खडाजंगी; काय झालं नेमकं? पाहा व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप! अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार एकनाथ शिंदेंकडे दाखल
Devendra Fadanvis : मुख्यमंत्रीपुत्र श्रीकांत शिंदेच्या जागेवरही भाजपचा दावा; फडणवीस म्हणाले उरलेल्या शिवसेनेबाबत…
मुख्यमंत्र्यांच्या धक्कातंत्राची आधीच लागली कुणकुण; उद्धव ठाकरेंनी १५ सेना नेत्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

 

 

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now