Share

आमदारांनी केस ओढत उपसभापतींच्या कानशिलात लगावली, विधानसभेतील हाणामारीचा LIVE व्हिडिओ

पाकिस्तानच्या पंजाब विधानसभा अधिवेशनात एक धक्कादायकप्रकार घडला आहे. आज काही आमदारांनी उपसभापती मुहम्मद मजारी यांना कानशिलात मारुन विधानभवनात एकच गोंधळ घातला. माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयच्या काही नेत्यांनी त्यांना कानिशिलात मारत त्यांचे केस ओढले आहे. (pakistan punjab mlas angry on deputy speaker)

पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाच्या निवडीसाठी बोलावलेल्या अधिवेशनाच्या अध्यक्षतेसाठी उपसभापती मजारी आले होते. त्यावेळी संबंधित घटना घडली आहे. समा टीव्हीच्या वृत्तानुसार, पीटीआयच्या काही आमदारांनी आधी उपसभापतींवर हातातले कागदं फेकून मारले आणि नंतर तिथे जाऊन त्यांच्या कानशिलात मारली. यावेळी तिथे चांगलाच गोंधळ झाला. काही नेते एकमेकांचे केसही ओढताना दिसून येत होते.

प्रचंड गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज तातडीने थांबवावे लागले. गोंधळानंतर काही आमदारांनी परत जाण्याच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. पंजाब विधानसभेचे अधिवेशन स्थानिक वेळेनुसार सकाळी ११.३० वाजता सुरू होणार होते मात्र गदारोळामुळे ते होऊ शकले नाही.

या घटनेनंतर पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजचे नेते अताउल्लाह तरार यांनी लाहोर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना या प्रकरणाची दखल घेण्याची विनंती केली आहे. पाकिस्तानचे संसद माजी पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांची नवीन सभापती म्हणून निवड करण्यासाठी आणि उपसभापती कासिम खान सुरी यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. कासिम खान यांनी इम्रान खानच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये काम केले होते.

https://twitter.com/SaniaaAshiq/status/1515237727742038018?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1515237727742038018%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Finternational%2Fpakistan-imran-khan-party-leaders-slapped-and-pull-hairs-of-deputy-speaker-in-punjab-assembly-of-pakistan-a720%2F

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे ७१ वर्षीय अश्रफ हे आज मंत्रिपदाची शपथ शपथ घेऊ शकतात. कारण शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत त्यांच्या विरोधात इतर कोणत्याही उमेदवाराने उमेदवारी अर्ज सादर केला नव्हता. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

दरम्यान, पदच्युत पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात असद कैसर अपयशी ठरले आहे. त्यामुळे त्यांनी ९ एप्रिल रोजी राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपद रिक्त झाले. अश्रफ हे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते आहेत जे पाकिस्तानचे पंतप्रधान आणि सध्याच्या आघाडी सरकारचे प्रमुखांचे सहयोगी देखील आहेत.

महत्वाच्या बातम्या-
गोविंदासोबत झळकलेल्या ‘या’ अभिनेत्रीला आता ओळखणंही झालं कठिण; झाली अशी अवस्था
आनंद शिंदेंसाठी नातवाने केली भावूक पोस्ट; म्हणाला, जरी आम्ही एक परिवार असलो तरी त्या क्षणाला..
९० च्या दशकातील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची आता झाली अशी अवस्था; ओळखणेही झालं कठिण

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now