Share

१००० पाकिस्तानही लता दीदींच्या जाण्याचं नुकसान भरून काढू शकत नाही, पाकिस्तानातून लता मंगेशकरांना श्रद्धांजली

प्रसिद्ध गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. २८ दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. (pakistan on lata mangeshkar death)

लता मंगेशकरांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ६.३० वाजता शिवाजी पार्कवर पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपुर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. तसेच अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

भारतातच नाही, तर जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. याला पाकिस्तानही अपवाद नाही. पाकिस्ताननेही लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पाकिस्तानातील अनेक नेत्यांनी लता दीदींना श्रद्धांजली वाहत त्यांच्याबद्दल ट्विट केले आहे.

पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. दीदींचं जाणं एक युगाचा अंत आहे, असे त्यांनी म्हटलं आहे. लता दीदी या दशकानू दशके संगीत जगतावर राज्य करणारी एक गानसम्राज्ञी होत्या, असेही त्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल कमर बाजवा यांचे वैयक्तिक सल्लागार असल्याचा करणाऱ्या झैदू नावाच्या एका ट्विटर हँडलने एक अजब ट्विट केले आहे. जे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे. त्या ट्विटर युझरने असे म्हटले की, एक हजार पाकिस्तानही लता दीदींच्या जाण्याचं नुकसान भरुन काढू शकत नाही असे म्हटले आहे.

https://twitter.com/TheZaiduLeaks/status/1490194833687805952?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1490194833687805952%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fdesh-videsh%2Fpakistanis-mourn-lata-mangeshkar-too-says-even-1000-pakistan-cannot-compensate-this-loss-hrc-97-2792900%2F

हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. आतापर्यंत या ट्विटला ५ हजारपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे. तर अनेकांनी या ट्विटवर कमेंट केल्या आहे. या ट्विटला रिप्लाय देत अनेकांनी लता दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच लता दीदींचे गाणे पोस्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडिजसोबतचा पहिला सामना जिंकताच भारतीय संघाने रचला इतिहास; वाचून वाटेल कौतूक
वर्ल्डकप जिंकल्याबद्दल BCCI कडून भारतीय संघाला मिळणार बंपर गिफ्ट; प्रत्येक खेळाडूला मिळणार ४० लाख अन्…
पत्नीचा काटा काढल्यानंतर स्वत:च पोलिस स्टेशनमध्ये जाऊन केली बेपत्ता असल्याची तक्रार, असा झाला खुनाचा खुलासा

आंतरराष्ट्रीय

Join WhatsApp

Join Now