सोमवारी १२६ वर्षीय स्वामी शिवानंद (योगगुरू शिवानंद बाबा) यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री सन्मानाने सन्मानित करण्यात आले. योग क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांना या सन्मानाने सन्मानित करण्यात आले. वाराणसीचे रहिवासी बाबा शिवानंद पुरस्कार घेण्यासाठी अनवाणी पायाने आले होते.
स्वामी शिवानंद यांना भारतीय जीवनपद्धती आणि योग क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. स्वामी शिवानंद हे वाराणसीचे असून त्यांचे ते 126 वर्षीय आहेत. जेवढी चर्चा त्यांना मिळालेल्या पुरस्काराची होतं आहे तेवढीच चर्चा त्यांच्या एका व्हिडिओची होतं आहे.
#WATCH Swami Sivananda receives Padma Shri award from President Ram Nath Kovind, for his contribution in the field of Yoga. pic.twitter.com/fMcClzmNye
— ANI (@ANI) March 21, 2022
सोमवारी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्काराच्या मानकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. सोमवारी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वामी शिवानंद पोहोचले तेव्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नमस्कार केला. स्वामी शिवानंद यांची ही कृती पाहून पंतप्रधान मोदींनीही नतमस्तक होऊन नमस्कार केला.
स्वामी शिवानंद एवढ्या वरच थांबले नाही तर त्यानंतर त्यांनी स्वामी शिवानंद यांनी रेड कार्पेट आणि स्टेजजवळ दोनदा डोके टेकून रामनाथ कोविंद यांनाही नमस्कार केला. सध्या सोशल मिडियावर 126 वर्षीय स्वामी शिवानंद यांचा हा व्हिडिओ तूफान व्हायरल होतं आहे.
दरम्यान, महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा यांनीदेखील स्वामी शिवानंद यांना पुरस्कार मिळाल्यानंतर कौतुक केलं आहे. ट्वीट करत ते म्हणाले, “हीच योगाची ताकद आहे. १२५ वर्षांच्या समर्पणाचे आयुष्य! स्वामी शिवानंद यांची वागणूक आणि प्रतिष्ठा नम्र आणि प्रेरणादायी आहे. योगाचा उगम झालेल्या देशाचे नागरिक असल्याचा अभिमान आहे”.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवानंद यांचा जन्म 1896 मध्ये झाला होता. जेवण न मिळाल्याने त्याच्या आई-वडिलांचा मृत्यू झाल्याचं बोललं जातं आहे. त्यानंतर त्यांनी आयुष्यभर अर्धे पोट खाईन अशी प्रतिज्ञा घेतली होती. तसेच काशीतील गुरू ओंकारानंद यांच्याकडे ते शिकले होते.
विशेष बाब म्हणजे आपल्या गुरूच्या आज्ञेनंतर त्यांनी परदेश दौरे केले व त्यांनी योगाभ्यास केला. या वयातही त्यांना योगविद्येचे भरपूर ज्ञान आहे. आजही ते दररोज योगा करतात. आज सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतं आहे. तसेच व्हिडिओ देखील व्हायरल होतं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी! अखिलेश यादव यांनी दिला राजीनामा, उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ
गोपीचंद पडळकरांनी सेनेच्या ढाण्या वाघाला दिलं खुलं आव्हान; ‘माझ्यासारखं महाराष्ट्रात फिरून दाखवा…’
‘छत्रपतीं’बाबत तडजोड नाहीच! चिन्मय मांडलेकरने न्यूज अँकरची बोलती केली बंद, व्हिडिओ व्हायरल
‘शेर शिवराज’ चित्रपटात अफजल खानाच्या भूमिकेत दिसणार बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता