राज्यात सध्या मशिदींवरील भोंगे आणि हिंदुत्वाच्या मुद्यावरुन राजकारण तापलेलं दिसत आहे. अशात अनेक भाजप नेते आणि सत्ताधारी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपण करताना दिसून येत आहे. आता भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली आहे. (padalakar shocking statement on sharad pawar)
बहुजनांचा बुरखा पांघरुन एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय. पन्नास वर्षातील त्याचा खेळ राज्यातील पोरांनी ओळखलाय, अशा शब्दांमध्ये गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर टीका केली आहे. पुण्यातील कामशेतमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवात बोलताना पडळकरांनी टीका केली आहे.
गोपीचंद पडळकरांनी यावेळी नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख मात्र शरद पवार यांच्यावरच होता. तसेच आरपीआयसह राज्यातील विविध संघटना आणि चळवळी कोणी फोडल्या? असा सवालही गोपीचंद पडळकर यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला आहे.
तसेच संघटना आणि चळवळी फोडण्याचं काम हे ५० वर्षांपासून बहुजनांचा बुरखा पांघरुन महाराष्ट्रात घुसलेल्या लांडग्याचं असल्याचं पडळकरांनी यावेळी म्हटलं आहे. आता गोपीचंद पडळकरांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राज्याचे राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर एसटी बँक निवडणुकीवरुन गंभीर आरोप केला होता. एसटी कर्मचारी आपल्या हक्कासाठी लढताना शकुनी मामा दोन हजार कोटींची बँक व त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव त्यांनी आखला आहे, असे पडळकरांनी व्हिडिओ शेअर करत म्हटले होते.
तसेच एसटी बँकेची निवडणूक घोषित केली आहे. जे सदस्य थकबाकीदार आहेत त्यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही, असा फतवा काढला आहे. सहाजिकच जे कर्मचारी बिनपगारी आपल्या हक्कासाठी लढा देत होते, तेच थकबाकीदार आहेत. त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क मिळणार नाही, असेही गोपीचंद पडळकर यांनी म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या-
सभेआधीच मनसेने शिवसेनेवर डागली तोफ; “मुख्यमंत्र्यांची अवस्था शोलेमधील असरानींसारखी…”
…म्हणून मी राज ठाकरेंच्या ताफ्यात नव्हतो; उलटसुलट चर्चानंतर वसंत मोरेंनी स्पष्टच सांगितलं
रोहितच्या वाढदिवसाला मुंबईने राजस्थानवर मिळवला दणदणीत विजय, ८ पराभवानंतर जिंकला पहिला सामना