राज्यातील दैनंदिन करोना रुग्णसंख्या एक हजाराहून कमी झाली असून, उपचाराधीन रुग्णांची संख्याही १० हजारांखाली आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह महत्वाच्या शहरांमध्ये करोनाची तिसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. करोनाची तिसरी लाट आटोक्यात आली असून, काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रविवारी सांगितले.
तर दुसरीकडे धडकी भरवणारी बातमी समोर येत आहे. हाँगकाँग या ठिकाणी करोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. सोमवारी 34,466 नव्या रुग्णांची नोंद झाली तर मृतकांचाही आकड वाढला. यामुळे लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता आरोग्य अधिकाऱ्यांनी नाकारली नाहीये.
याबाबत बोलताना हाँगकाँग शहरातील सार्वजनिक डॉक्टर्स असोसिएशनचे प्रमुख टोनी लिग म्हणाले, रुग्णालयात अपघात आणि आपत्कालीन कक्षात मृतदेह नेण्याची वाट पहावी लागत आहे. शवागर आणि इतर सुविधा कमी पडताना दिसत आहेत. यामुळे हाँगकाँगमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, हाँगकाँगमधील अनेक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली नसल्याची माहिती मिळत आहे. 2020च्या सरकारी आकडेवारीनुसार, हाँगकाँगमध्ये प्रत्येक महिन्यात सरासरी 4 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे.
तर दुसरीकडे करोनाची तिसरी लाट आलेली असताना देशात नोंदवण्यात आलेली सर्वाधिक ओमायक्रॉन प्रकरणं मोठ्या शहरांमधील असल्याचं देशाच्या लस टास्क फोर्सच्या प्रमुखांनी सांगितलं आहे. देशात करोनाची तिसरी लाट जवळपास आली असल्याचंही यावळी बोलताना त्यांनी सांगितले.
दिलासादायक बाब म्हणजे राज्यात मागील दोन महिन्यांपासून रुग्णसंख्येचा आलेख वेगाने वर नेणारी तिसरी लाट आता बहुतांश भागांमध्ये ओसरली आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नगर, नाशिक, औरंगाबाद आणि ठाणे वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये तर ही लाट पूर्णपणे ओसरली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मुलांनी म्हातारपणात सोडलं वाऱ्यावर, मग म्हाताऱ्यानेही इंगा दाखवत 3 कोटींची संपत्ती केली दान
‘मी त्याला फोन लावला आणि त्याने मला एकटीला भेटायला बोलावलं’, अभिनेत्रीच्या खुलाश्याने खळबळ
जगातील सर्वात मोठी आणि शक्तिशाली सेना कोणत्या देशाकडे आहे? वाचून आश्चर्य वाटेल
जगातील सर्वात मोठी आणि शक्तिशाली सेना कोणत्या देशाकडे आहे? वाचून आश्चर्य वाटेल