Share

AAP: दिल्लीतही ऑपरेशन लोटस, आपचे ४० आमदार नाॅट रिचेबल; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मारली दांडी

arvind kejariwal

आम आदमी पक्ष (AAP): दिल्लीत आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष सुरूच आहे. महाराष्ट्र आणि बिहारनंतर आता संपूर्ण देशाचे लक्ष दिल्लीकडे लागले आहे. दिल्लीत आम आदमी पार्टीचे आमदार संपर्कात नसल्याची चर्चा चालू आहे. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसनंतर आता दिल्लीतही ऑपरेशन लोटसची चर्चा आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपविरोधात भविष्यातील रणनीती ठरवण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली होती.

बैठकीला सुमारे ४० आमदारांची दांडी मारली. त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही, त्यामुळे आम आदमी पार्टीच्या मनात धास्ती वाढली आहे. बैठक सुरू होईपर्यंत सर्वजण येतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. 70 जागांच्या दिल्ली विधानसभेत ‘आप’ला 62 आणि भाजपला 8 जागा आहेत. सरकार स्थापनेसाठी 36 आमदारांची गरज आहे.

भाजप आम आदमी पार्टीचे आमदार फोडण्याच्या प्रयत्न करीत असल्याचा आरोप आपच्या नेत्यांनी केला आहे. आपचे नेते दिलीप पांडे म्हणाले, “भाजप प्रत्येक आमदाराला 20 कोटी देऊ करत आहे आणि 40 आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला तर भाजप सद्या 800 कोटी रुपये घेऊन उभा आहे. हा काळा पैसा भाजपकडे आला कुठून? त्याची सीबीआय आणि ईडीने चौकशी करावी.

आमदारांशी संपर्काचा प्रश्न आहे, मला आशा आहे की सर्वजण संपर्कात येतील, ज्यांना बोलता येत नाही, त्यांच्याशीही बोलले जाईल. सर्व आमदारांशी बोलत आहे. काल सर्वांना संदेश पाठवला आहे. मी आशा करतो की मीटिंग सुरू होईपर्यंत सर्वजण येतील.भाजप निवडून आलेले सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा आप नेत्यांनी बुधवारी केला आहे.

भाजप प्रत्येक आमदाराला मदतीसाठी २० ते २५ कोटी रुपयांची ऑफर देत असल्याचे ते म्हणाले होते. भाजपने मात्र हा आरोप ठामपणे फेटाळून लावला आणि दिल्ली दारू घोटाळ्यावरून लक्ष वळवण्यासाठी पक्ष असे म्हणत असल्याचा आरोप केला. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर 19 ऑगस्ट रोजी सीबीआयने छापा टाकला होता. त्यांची १४ तास चौकशी सुरु होती. त्यावेळी सिसोदिया यांनी स्पष्ट केले होते की, भाजपने त्यांना ‘आप’ सोडण्याची आणि मुख्यमंत्री होण्याची ऑफर दिली होती.

महत्वाच्या बातम्या
Thailand: लोकांनी मुलीचा मृतदेह समजून पोलिसांना बोलावलं पण ती निघाली महागडी सेक्स डॉल
Aditya Thackeray : आदित्य ठाकरे बोलले तुम्हाला लाज वाटली पाहिजे; भडकलेले मुनगंटीवार म्हणाले, आपल्या वडिलांना…
Aditya Thackeray : आदित्य ठाकरे बोलले तुम्हाला लाज वाटली पाहिजे; भडकलेले मुनगंटीवार म्हणाले, आपल्या वडिलांना…
BJP : मुख्यमंत्री शिंदेंवर भाजपचा वॉच; कार्यालयात कायम असणार फडणवीसांचा ‘हा’ खास माणूस

इतर ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now