Share

“याद राखा…! मुंबईत फक्त शिवसेनाच दादा, आम्हीच मुंबईत दादागिरी करणार”

sanjay raut

शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी थेट उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं आहे. नायडू यांना लिहिलेल्या पत्रात राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, संजय राऊत यांच्या गंभीर आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. (only shiv sena is king of mumbai sanjay raut)

तसेच राऊत यांनी या पत्रानंतर दिल्लीत पत्रकार परिषद घेत अनेक खळबळजनक आरोप केले. ‘केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून आमच्यावर खोटेनाटे आरोप केले जात आहेत. बदनाम करण्याचं काम सुरू आहे. ते भ्रमात आहेत. पण आम्ही या दडपशाहीला घाबरणार नाही. तुमची दादागिरी खपवून घेणार नाही. याद राखा, मुंबईत शिवसेनाच दादा आहे. आम्हीच मुंबईत दादागिरी करणार आहोत, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, माझ्या मुलीच्या लग्नातील फुलवाला, डेकोरेशनवाल्याला ईडीवाल्यांनी उचलून आणलं. हे त्यांचं काम आहे का? किती पैसे मिळाले विचारलं असता डेकोरेशनवाल्याने आपले कुटुंबाशी चांगले संबंध असल्याने पैसे घेतले नसल्याचं सांगितलं.

ती मुलगी माझ्यासमोर मोठी झाली आहे, ते माझ्या कुटुंबासारखे आहेत..मी कसे पैसे घेणार असं त्याने सांगितलं. पण त्याला बंदुकीचा धाक दाखवत धमकावण्यात आलं. ही काय दादागिरी आहे. ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे असं राऊत म्हणाले आहेत.

याचबरोबर आमच्या पक्षाचे आमदार, खासदार, राजकीय नेते तसेच त्यांचे नातेवाईक, मित्र आणि परिचित यांना धमकावण्यास आणि त्यांचा छळ करण्यात येत असल्याचाही आरोप राऊत यांनी केला आहे. माझ्यावर ठाकरे सरकार पाडण्यासाठी दबाव पाडण्यासाठी दबाव निर्माण केला जात असल्याचे देखील त्यांनी म्हणाले.

दरम्यान, यामध्ये तुम्ही हस्तक्षेप करावा, अशी मागणी राऊत यांनी उपराष्ट्रपतींना पाठवण्यात आलेल्या पत्रात केली आहे. ईडीनं माझ्या आणि माझ्या कुटुंबाविरोधात कट रचल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी उपराष्ट्रपती नायडू यांना पाठवलेलं पत्र राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांना पाठवलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
शनिवार रविवार शाळा सुरु ठेवून बुडालेला अभ्यासक्रम पूर्ण करा; अजितदादांचे शिक्षकांना आदेश
“मोदींनी ज्या रेल्वे स्टेशनवरती चहा विकला ते सुद्धा काँग्रेसने बांधलेय”
पादचारी वारकऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार पंधरा फूट उडून भीषण अपघात; 2 जण जागीच ठार…
मराठी कलाकार लता दीदींच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? अभिनेत्रीने दिलं ‘हे’ उत्तर, पोस्ट चर्चेत

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now