Share

मुख्याध्यापकाला चप्पलेने मारून समाधान नाही झाले, मग दांडक्याने चोपले..; महिलेच्या संतापाचे कारण वाचून हैराण व्हाल

अलीकडच्या काळात सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगताच येत नाही. नुकताच धुलीवंदन सण पार पडला आहे. धुलीवंदनाच्या दिवशी मुख्याध्यापकाने ( Principal) दारूच्या नशेत एका महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ केली आहे. यानंतर संतापलेल्या महिलेने मुख्याध्यापकाला बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धुलीवंदनाच्या दिवशी मुख्याध्यापकाने दारू पिऊन महिलेला अश्लील शब्दात शिवीगाळ केली. त्यानंतर संतापलेल्या महिलेने भर रस्त्यात मुख्याध्यापकाला गाठले. महिलेने मुख्याध्यापकाला चपलेने आणि काठीच्या सहाय्याने बेदम मारहाण केली.

https://twitter.com/ChilkulwarNupur/status/1633854653262884865?s=08

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरडाळा येथे हा मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे. मुख्याध्यापकाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे शैक्षणिक विभागात मोठी खळबळ उडाली आहे. यादरम्यान या मुख्याध्यापका विरोधात अनेक तक्रारी शैक्षणिक विभागकडे आल्या असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

मुख्याध्यापकाने केलेल्या या कृत्यामुळे त्याच्यावर चिखल फेक केली जात आहे. तडाळा येथे हा मुख्याध्यापक धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी गावात आला होता. त्याने पीडित महिलेला फोन केला आणि तिला गाठून एका महिलेला अश्लील शब्दात शिवीगाळ करत होता.

यावेळी महिलेला हा व्यक्ती गावातलाच असल्याची खात्री पटली. तो गावच्या मुख्यमार्गावर येताच महिलेने त्याला जागीच गाठलं. त्यानंतर चपलेने चांगलाच झोडून काढलं. त्याचवेळी काठीने बेदम मारहाण करत त्याची चांगलीच मिरवणूक काढली. पण तिच्या या रुद्रावतारा पुढे तो मुख्याध्यापक देखील काहीही करू शकला नाही.

या घटने प्रसंगी अनेक नागरिक जमा झाले होते. मात्र नागरिकांनी यावेळी घटनेचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. हा व्हिडिओ पाहून शिक्षकांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाची अवस्था प्रचंड बिकट असल्याचं या व्हिडिओमधून दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या
रामदास कदमांचा भाऊ ईडीच्या ताब्यात! उद्धव ठाकरे गटात जाताच ईडीने केली मोठी कारवाई
महाराष्ट्रात पुन्हा पेटणार राजकीय युद्ध! ‘या’ तीन मोठ्या नेत्यांनी ठोकला शड्डू, भाजप-शिंदेंचं टेंशन वाढलं

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now