आज हिजाब वादावरुन कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. इस्लामिक धार्मिक प्रथांप्रमाणे हिजाब परिधान करणं हे आवश्यक नसल्याचं मत कर्नाटक उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. आज विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये हिजाब घालण्यासाठी परवानगी देण्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल जाहीर केला.
तसेच हिजाब हा धर्माचा अविभाज्य भाग नाही. हिजाब घालणं इस्लाममध्ये बंधनकारक नाही, असं सांगतानाच शाळेत हिजाब परिधान करायचा की नाही हा सर्वस्वी शाळा प्रशासनाचा अधिकार आहे. तेच निर्णय घेतील, असा ऐतिहासिक निर्णय कर्नाटक हायकोर्टाने दिला आहे.
आता या निकालावर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत असून माजी खासदार हुसेन दलवाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”श्रीमंत मुस्लिमांच्या मुली परदेशात शिकतात तेव्हा त्या हिजाब घालतात का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच या वादामुळे मुस्लिम मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत”, असंही दलवाई म्हणाले.
माध्यमांशी बोलताना दलवाई म्हणाले, ”एका शाळेत सुरु झालेला वाद सगळ्या देशभरात कोण घेऊन गेलं? जरा उचकवलं की या मुद्द्यावर राजकारण करू पाहणाऱ्यांना हवं ते मिळतं हे मुस्लिमांनी लक्षात घ्यायला हवं. या अशाप्रकारच्या वादामुळे मुस्लिम मुली शिक्षणापासून वंचित राहता कामा नयेत.”
तसेच “हिजाब प्रकरणातील निकालामुळे मी खूप निराश आहे. मी याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याची विनंती करतो आणि मी त्यासाठी मदत करण्यास तयार आहे.प्रत्येक धर्मातील प्रत्येक बहिणीला तिच्या शालीनतेचे रक्षण करण्यासाठी तिला हवे असल्यास काहीही घालण्याचे स्वातंत्र्य नक्कीच असले पाहिजे,” असं काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांनी म्हटलं आहे.
तर दुसरीकडे “मी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करते, कारण कुराणानुसार ही प्रथमतः धार्मिक प्रथा नाही. दुसरे म्हणजे, जेव्हा विद्यार्थी शैक्षणिक संस्थेत प्रवेश करतात तेव्हा त्यांनी तिथल्या नियमांचे पालन केले पाहिजे,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
‘2024 मध्ये मोदी युगाचा होणार अंत, बनणार युपीए सरकार’, ‘या’ बड्या नेत्याची भविष्यवाणी
“रडण्यासाठी मला ग्लिसरिन लावावे लागले नाही, कारण…”; खेर यांनी सांगितला ‘द कश्मीर फाईल्सचा’ भयानक अनुभव
इयत्ता आठवीची मुलगी घरातून झाली फरार, व्हॉट्सऍपच्या चेक करताच पोलिसांनाही बसला हादरा
पट्ठ्याने करून दाखवलं! २४८ गुण मिळवून झाला PSI; गरीब बापाने चक्क घोड्यावरून काढली मिरवणूक