Omkar bhojane | महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो सध्या खुप गाजतोय. त्यातील कलाकारही खुप प्रसिद्ध आहे. अशातच आता अभिनेता ओंकार भोजनेने महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो सोडला. त्याने शो सोडल्यानंतर चाहत्यांना धक्काच बसला. त्याने असा अचानक शो का सोडला? असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण त्याचे कारण आता समोर आले आहे.
ओंकार भोजनेने समोर येऊन याचे कारण सांगितलं आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून ओंकार भोजने घराघरात पोहोचला. हास्यजत्रेतून त्याने प्रेक्षकांना खळखळून हसवलं पण त्याने अचानक शो सोडल्याने प्रेक्षक नाराज झाले होते. त्याला पुन्हा हास्यजत्रेत पाहण्यासाठी प्रेक्षक अतुरले आहेत.
हास्यजत्रा म्हटलं की, ओंकार भोजने हे नाव पहिल्यांदा घेतलं जातं. नुकतीच ओंकारने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली ज्यात त्याने हास्यजत्रा सोडल्याचे कारण सांगितले आहे. तो म्हणाला, हास्यजत्रा करत असताना मला दोन सिनेमांच्या ऑफर्स आल्या होत्या.
सिनेमात काम करण्याची संधी मिळाली पण त्यासाठी मला हास्यजत्रेच्या टीमला ऍडजस्ट करावं लागत होतं. या कारणामुळे मला ब्रेक हवा होता. त्याचप्रमाणे माझी तब्येत देखील ठीक नव्हती म्हणून मी हास्यजत्रा सोडण्याचा निर्णय घेतला. पण हास्यजत्रा सोडल्यानंतर ओंकार फू बाई फू मध्ये दिसला.
त्याविषयी बोलताना तो म्हणाला की, मला एक फोक प्रकार करायचा होता. फू बाई फू ने मला फोक प्रकार करण्याची संधी दिली म्हणून मी तो शो स्वीकारला. या सगळ्यातून मी खुप काही शिकलो आणि सध्या माझं चांगलं सुरू आहे, असं ओंकार भोजनेनं स्पष्ट केलं आहे.
ओंकार भोजनेचा सरला एक कोटी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ओंकार भोजनेसोबत अभिनेत्री इशा केसकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता ओंकार पुन्हा हास्यजत्रेत दिसेल का नाही? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहेे. अनेक चाहते त्याची वाट पाहत आहेत.
महत्वाच्या बातम्या
निवडणूक आयोगात एकनाथ शिंदेनी फेकला सर्वात मोठा पत्ता! उद्धव ठाकरेंना जबर धक्का
विराटच्या शतकासमोर शनाकाची झंझावाती खेळी व्यर्थ, भारताने श्रीलंकेचा ६७ धावांनी उडवला धुव्वा
स्टाॅक नाही हा तर कुबेराचा खजिना! १० हजाराचे झाले १५ कोटी; एका झटक्यात झाले मालामाल
पोटच्या गोळ्याला १७ वर्षे स्वत:पासून दूर ठेवलं, कारण..; हिंदकेसरी अभिजीत कटकेची आई भावूक