तुम्हाला थ्री इडियट चित्रपट आठवतोय? तीन मित्रांची गोष्ट सांगणार्या या चित्रपटात चतुर रामलिंगम उर्फ सायलेन्सरच्या पात्राने धमाल आणली होती. किंबहुना हा चित्रपट जेवढा रँचोचा आहे तेवढाच चतुरचा आहे असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही.
अतिशय हुशार विद्यार्थी असलेल्या चतुरची रॅंचोसोबत म्हणजेच आमिर खान सोबत या चित्रपटातली चढाओढ बघायला मिळाली. चतुर उर्फ ओमी वैद्यचा हा पहिलाच चित्रपट होता. मूळचा अमेरिकेचा रहिवासी असलेला मराठीभाषिक अभिनेता इंग्रजीचा अॅक्सेंट असलेल्या या अभिनेत्याने हिंदीमध्ये बोलताना अडखळायचा त्याने चांगलीच विनोदनिर्मिती झाली.
अर्थात ही त्या भूमिकेचीही गरज होती. जी ओमी वैद्यने अगदी हुबेहूब वटवली. या चित्रपटात माधवन, शर्मन जोशी, करिना कपूर खान, बोमन इराणी यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. त्यानंतर ओमी दिल तो बच्चा है जी या चित्रपटात दिसला होता.
या चित्रपटात अजय देवगण आणि इम्रान हाश्मी हेदेखील होते. यानंतर मात्र तो मोठ्या पडद्यावर कुठेही दिसला नाही. आता तो परत येतोय एक नव्या भूमिकेत….दिग्दर्शकाच्या! विशेष म्हणजे ओमी या चित्रपटात लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अशा तिहेरी भूमिकेत आहे. त्याच्यासोबत विद्याधर जोशी, ईला भाटे हे देखील आहेत.
नुकतेच या मराठी चित्रपटाचे पहिले दृश्य चित्रीत करण्यात आले. या सिनेमाची तांत्रिक बाजू कलाकार तंत्रज्ञ राजेश कोलन, तेजस कुलकर्णी, छायाचित्रकार योगेश कोळी, कार्यकारी निर्माता कुशल कोंडे, अनुप गोरे, अॅड. अभिजीत अंतुरकर, सौरभ कापडे, सोनिया सहस्त्रबुध्दे हे सांभाळत आहेत. असे असले तरी चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्त्यातच आहे.
महत्वाच्या बातम्या
लग्नानंतर 16 वर्षांनी प्रभुदेवाचं ‘या’ अभिनेत्रीवर जडलं प्रेम, पत्नीशी घटस्फोट घेताच आयुष्यात आला भलताच ट्विस्ट
शर्माजी नमकीनच्या पोस्टरमध्ये दोन हिरो का दिसतात? किस्सा वाचाल तर व्हाल भावूक
हत्या करून मृतदेह लोखंडी पाईपला लटकावला; धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं!