Share

ओम पुरीच्या पत्नीचे खळबळजनक आरोप, ‘केकेचा खूनच झालाय, CBI चौकशी व्हावी’

प्रसिद्ध गायक केके यांनी जगाचा निरोप घेतला. वयाच्या 53 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. कुटुंब आणि मित्रपरिवारच नाही तर लाखो चाहत्यांच्या डोळ्यांत पाणी आलं पण शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी चाहत्यांना निराश केले नाही. केके यांचे ३१ मे रोजी निधन झाले. कोलकाता येथे लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

सिंगरच्या मृत्यूनंतर कोलकाता पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. त्याचवेळी या प्रकरणावर दिवंगत अभिनेते ओमपुरी यांची माजी पत्नी नंदिता पुरी यांचे एक आश्चर्यकारक विधान समोर आले आहे. केकेच्या मृत्यूसाठी कोलकात्याला जबाबदार धरून त्यांनी सीबीआय तपासाची मागणी केली आहे. नंदिता पुरी यांनी कोलकात्याने गायक केकेची हत्या केल्याचा दावा केला आहे.

केके यांच्या निधनानंतर दिवंगत अभिनेते ओमपुरी यांच्या माजी पत्नी नंदिता पुरी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी फेसबुकवर एक लांब पोस्ट शेअर केली आणि म्हटले आहे की, कोलकाताने केकेची हत्या केली आहे.

फेसबुकवर संताप व्यक्त करताना नंदिता पुरी यांनी लिहिले, पश्चिम बंगालची लाज वाटते. कोलकाताने केकेची हत्या केली आणि आता सरकार त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत आहे. नजरमंच येथे कोणतीही खबरदारी घेण्यात आली नाही. अडीच हजार लोकांची क्षमता असलेल्या सभागृहात सात हजार लोक कसे आले.

एसी काम करत नव्हता, सिंगरने चार वेळा तक्रार केली. औषधांची सोय नव्हती आणि प्राथमिक उपचारही नव्हते. सीबीआय चौकशी झाली पाहिजे. तोपर्यंत बॉलीवूडने कोलकत्यातील कार्यक्रमांवर बहिष्कार टाकावा. नंदिता यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. केकेचे अनेक चाहते नंदिताच्या पोस्टचे समर्थन करत सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, केकेचा कोलकाता येथे 2 दिवसांचा लाइव्ह कॉन्सर्ट होता. 30 मे रोजी सादरीकरण केल्यानंतर 31 मे रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत केके यांनी नजरल मंच येथे सादरीकरण केले. यादरम्यान केके यांची प्रकृती खालावली होती. केके यांनी छातीत दुखणे आणि अस्वस्थतेची तक्रार केली होती.

या कॉन्सर्टचे अनेक व्हिडिओही व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये मला आराम वाटत नाही असं केके म्हणताना दिसत आहेत. मृत्यूनंतर त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जखमा झाल्याची बाबही समोर आली होती, त्यानंतर पोलिसांनी असामान्य मृत्यूची नोंद करून चौकशी सुरू केली आहे.

महत्वाच्या बातम्या
मोदींच्या दौऱ्यादरम्यान कानपुरमध्ये दंगल; नमाज पठणानंतर रस्त्यावरच राडा, तुफान दगडफेक
भारत-पाकिस्तानमध्ये होणार पुन्हा महामुकाबला, ‘या’ दिवशी रंगणार सामना, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
मी तुला पहिल्यांदा भेटलो तेव्हाच तू.., लग्न होताच दीपक चाहरची पत्नीसाठी खास पोस्ट
दीपक चाहरच्या पत्नीची पतीसाठी प्रेमळ पोस्ट, म्हणाली, त्यानं माझं ह्रदय चोरलं म्हणून…

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now