जयपूर एसीबीच्या पथकाने अधिकारी सिंधू कुमारीला अटक केली, जिने मेडिकल तपासणीच्या नावाखाली लाच घेतली होती. महिला ड्रग इन्स्पेक्टरच्या अटकेनंतर मेडिकल क्षेत्रातील हेराफेरीचा पर्दाफाश झाला आहे. त्याचवेळी सिंधू कुमारी यांनी एसीबीला ज्या गोष्टी सांगितल्या त्याही धक्कादायक होत्या. (officer sindhu kumari arrested)
मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या सिंधू कुमारीवर जयपूरमधील ५०० मेडिकल स्टोअर्सची तपासणी करण्याची जबाबदारी होती. त्याचबरोबर प्रत्येक दुकानातून ती दरमहा पाच-पाच हजार रुपये घेत होती. याबाबत स्वत: सिंधू कुमारीनेच खुलासा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा एसीबीने सिंधू कुमारीला पकडले तेव्हा ती म्हणाली, सर, हे पैसे फक्त माझे नाही, आम्हाला वरपर्यंत पैसे द्यावे लागतात, नाहीतर बिकानेरसारख्या जिल्ह्यात बदली केली जाते. चौकशीत महिला अधिकाऱ्याने लाचेची रक्कम ड्रग कंट्रोलरला दिल्याची कबुली दिली आहे. तसेच पैसे नाही दिले तर त्याच्या बदल्यात अधिकाऱ्यांनी बदली करण्याची धमकीही दिली, असेही सिंधू कुमारीने म्हटले आहे.
ड्रग इन्स्पेक्टर सिंधू कुमारी लाच घेत असताना वैद्यकीय विभागात बैठक सुरू होती. तिला बोलावले जात होते, मात्र ती लाच घेण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये पोहोचली. सिंधू कुमारी यांच्याकडे जयपूरच्या सर्वात मोठ्या वैद्यकीय व्यवसायाची बाजारपेठ ‘सेठी कॉलनी’चीही जबाबदारी होती.
इन्स्पेक्टर असूनही वाहन, चालक अशा सुविधा तिला दिल्या जात होत्या. गेल्या वेळी जेव्हा कोरोनामध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे संकट आले होते, तेव्हाही मेडिकल विभागाने त्याची संपूर्ण जबाबदारी ड्रग इन्स्पेक्टर सिंधू कुमारी यांच्यावर दिली होती.
मानसरोवर येथील रहिवासी असलेल्या तक्रारदाराने नुकतीच एसीबीमध्ये तक्रार दिली होती की, ड्रग इन्स्पेक्टर सिंधू कुमारी वसुलीसाठी दबाव आणत आहेत. पैसे न दिल्यास ते जास्त दंड आकारण्याची आणि मेडिकल जप्त करण्याची धमकी देत आहे.
तक्रारीनुसार, सिंधू कुमारीने १० हजार रुपयांची मागणी केली होती. ५ हजार रुपये घेताना एसीबीने तक्रारीची पडताळणी करून शुक्रवारी ४ फेब्रुवारी रोजी दुसऱ्या हप्त्याचे ५ हजार रुपये घेताना एसीबीने ड्रग इन्स्पेक्टर सिंधू कुमारी यांना रंगेहात अटक केली. आता एसीबीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक बजरंगसिंग शेखावत यांच्या पथकाने महिला अधिकाऱ्याच्या घराची झडती घेण्यास सुरुवात केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
सोनू सूदचा एक फोन अन् युक्रेनमधून सुखरुप सुटला तरुण, विद्यार्थ्यानेच सांगितलं तिथे काय घडलं?
शेन वॉर्न निधनाच्या आधीपासूनच होता दु:खात, मृत्युच्या आधीचे ट्विट पाहून बसेल धक्का
युट्युबवर बघून शेतीमध्ये ‘हा’ प्रयोग करणे तरुणाला पडले महागात, जळगाव पोलिसांनी घेतलं ताब्यात