Share

२०० किमीची रेंज, २ तासात फुलचार्ज; भारतात लाँच होणार १ लाखापेक्षा कमी किंमत असलेली इलेक्ट्रिक बाईक

भारतीय इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमध्ये ओबेन रोर नावाच्या इलेक्ट्रिक बाईकची एंट्री झाली आहे. त्याची बुकिंग १८ मार्चपासून सुरू होईल आणि ही बाईक फक्त ९९९ रुपये भरून बुक करता येईल. EV स्टार्टअपने ऑफर केलेल्या इलेक्ट्रिक मोटरसायकलची किंमत ९९,९९९ रुपये (एक्स-शोरूम) आहे. (oben electric bike 200 km range)

EV स्टार्टअपचा दावा आहे की, रोर इलेक्ट्रिक मोटरसायकल एका चार्जवर २०० किमीची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते, जे स्वतःमध्ये एक विशेष वैशिष्ट्य आहे. ओबेन रोर मोटरसायकल सुरुवातीच्या टप्प्यावर ७ राज्यांमध्ये लाँच करण्यात आली आहे. या मोटरसायकलची टेस्ट ड्राइव्ह लवकरच सुरू होणार आहे.

तसेच, त्याची डिलिव्हरी या वर्षाच्या जुलै २०२२ पासून सुरू होऊ शकते. या मोटारसायकलच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर ती खूपच आकर्षक दिसते. या इलेक्ट्रिक मोटरसायकलला सर्व एलईडी हेडलॅम्प मिळतील जे एलईडी डेटाइम रनिंग लाईट्ससह येतील. ही मोटरसायकल ट्रिपल टोन कलरमध्ये येते.

ओबेन ईव्हीचा दावा आहे की ही नवीनतम इलेक्ट्रिक मोटरसायकल पूर्णपणे भारतात बनविली गेली आहे. त्यात एरोडायनॅमिक डिझाइन आहे. या मोटरसायकलमध्ये असलेली टेक्नॉलॉजी आणि सर्व-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असल्याचा दावा करण्यात आला आहे.

ओबेन रॉर इलेक्ट्रिक मोटरसायकलला पॉवर देण्यासाठी, ४.४kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे, ज्यामध्ये १०kW इलेक्ट्रिक मोटर्स देण्यात आल्या आहेत. ही पॉवरट्रेन ६२ एनएमचा पीक टॉर्क निर्माण करू शकते. या उत्पादनाशिवाय दर ६ महिन्यांनी नवीन उत्पादन लाँच करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

ही इलेक्ट्रिक मोटरसायकल ३ सेकंदात ०-४० किमीचा वेग गाठते. या हायस्पीड इलेक्ट्रिक मोटरसायकलचा टॉप स्पीड १०० किमी प्रतितास असल्याचा दावा करण्यात आला आहे. यात इको, सिटी आणि हॅवॉक असे तीन राइडिंग मोड आहेत. या मोटरसायकलची बॅटरी अवघ्या २ तासात पूर्ण चार्ज होते. ही मोटरसायकल रिव्हॉल्ट आरव्ही ४०० शी स्पर्धा करेल.

महत्वाच्या बातम्या-
‘फिल्मचे कौतुक ऐकायला चांगलं वाटत नाही’, काश्मिर फाईल्सचे शुटींग डायरेक्टर असं का म्हणाले?
जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या यशानंतर.., स्वरा भास्करने विवेक अग्निहोत्रींना मारला टोमणा?
जबरदस्त! १२ रुपयांच्या या शेअरने गुंतवणूकदारांना केले करोडपती, तुम्ही घेतला का ‘हा’ शेअर ?

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now