याशिवाय, भाजपा दिल्ली मीडियाचे प्रमुख नवीनकुमार जिंदाल यांनाही निलंबित करण्यात आले आहे. याचबरोबर मुस्लिम समाजातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. नुपूर शर्मा यांच्यावर कारवाईची माहणी होत होती. या प्रकरणी त्यांच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ झाल्याच पाहायला मिळत आहे.
वाचा पोलिसांनी काय घेतली अॅक्शन..? काही दिवसांपूर्वीच शर्मा यांनी मुस्लिम धर्मियांचा पवित्र ग्रंथ व श्रद्धास्थान कुरान आणि अल्लाहचे नबी मोहम्मद पैगंबर व त्यांची पत्नी हजरत आयेशा यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर एकच गदारोळ माजला.
त्यांच्या या व्यक्तव्यानंतर राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलं. या प्रकरणी रझा अकादमीचे भिवंडीतील सदस्य वकास मलिक यांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आता या याप्रकरणी पोलिसांनी देखील अॅक्शन घेण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, नुपूर शर्मा यानां 13 जून रोजी पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी समन्स बजावला आहे. यामुळे आता नुपूर शर्मा यांच्या अडचणींमद्धे वाढ होणार असल्याच पाहायला मिळत आहे. दरम्यान, या वादात आता भीम आर्मीने उडी घेतली आहे. नुपूर शर्मा यांची जीभ कापणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा भीम आर्मीने केली आहे.
भीम आर्मीचे प्रमुख नवाब सतपाल तन्वर यांनी ही घोषणा केली आहे. तसेच कानपूर हिंसाचाराची सुत्रधार नुपूर शर्मा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसेच नुपूर शर्मांच्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. हा मुद्दा इतका पेटला आहे की जागतिक पातळीवर पोहोचला आहे. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर अनेक मुस्लिम देशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेक देशांनी भारताच्या विरोधात भूमिका घेतली आहे.