अॅमस्टरडॅम : आखाती देशांसह मुस्लिमबहुल देशांमध्ये भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचा निषेध होत असताना नेदरलँडचे खासदार गर्ट वाइल्डर्स यांनी त्यांना उघडपणे पाठिंबा दिला आहे. गर्ट वाइल्डर्स म्हणाले की, भारतीय नेत्या नुपूर शर्मा यांनी पैगंबराबद्दल सत्य सांगितल्याने अरब आणि इस्लामिक देश संतापले हे अतिशय हास्यास्पद आहे. त्यांनी विचारले की भारताने माफी का मागावी? त्यांनी भारतीयांना नुपूर शर्माचा बचाव करण्याचा सल्ला दिला.
नेदरलँड्सचे खासदार गर्ट वाइल्डर्स यांनी ट्विट केले: “तुष्टीकरणाचा काहीही फायदा होत नाही. त्यामुळे गोष्टी वाईटच होतात. म्हणूनच माझ्या भारताच्या मित्रांनो, तुम्ही मुस्लिम देशांच्या धमक्यांना घाबरू नका. स्वातंत्र्यासाठी उभे राहा आणि प्रेषितांबद्दल सत्य बोलणाऱ्या तुमच्या नेत्या नुपूर शर्माचा बचाव करण्यात अभिमान बाळगा.’
या ट्विटनंतर गिर्ट वाइल्डर्स यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यावर ते म्हणाले की, मला पाकिस्तानपासून तुर्कस्तानपर्यंत धमक्या दिल्या जात आहेत, मात्र या धमकीने काहीही साध्य होणार नाही. मी सत्य सांगणे थांबवणार नाही.
प्रेषितांवर केलेल्या वादग्रस्त टिप्पणीवर मुस्लिम देशांनी टीका केली आहे. यापूर्वी कतार, कुवेत, पाकिस्तान, इंडोनेशियासह 10 हून अधिक मुस्लिम देशांनी पैगंबरावर केलेल्या वक्तव्यावर टीका केली होती. नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा सौदी अरेबियानेही निषेध केला आहे.
सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने नुपूर शर्माच्या वक्तव्यावर टीका केली आणि जाहीरपणे निषेध केला. “परराष्ट्र व्यवहार मंत्रालय प्रेषित मोहम्मद यांचा अपमान करणार्या टिप्पणीबद्दल भाजपच्या माजी प्रवक्त्याचा निषेध करते आणि जाहीरपणे निषेध करते.” सौदी अरेबियाने इस्लामच्या सन्मानाचा पुनरुच्चार केला.
अल अरेबियाच्या रिपोर्टनुसार, सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने नुपूर शर्मा यांना भाजपमधून निलंबित करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. सौदी अरेबियाने सर्व धर्म आणि श्रद्धांचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. कतार आणि कुवेतनेही भारताच्या राजदूतांना पाचारण केले आहे.
नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याबद्दल कतारने भारत सरकारने जाहीरपणे माफी मागावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, निलंबित झाल्यानंतर नुपूर शर्माने आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली असून आपण बिनशर्त आपले वक्तव्य मागे घेत असल्याचे म्हटले आहे. कोणाच्याही धार्मिक श्रद्धा दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता असे त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना शिरच्छेद आणि बलात्काराच्या धमक्या, ट्विट करत पोलिसांना म्हणाल्या..
भाजपा प्रवक्त्याच्या वादग्रस्त विधानाने आखाती देशात भारताविरुद्ध संताप; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण..
अरब देशातील कचराकुंडीवर मोदींचा फोटो; कॉंग्रेसने मोदींची बाजू घेत तीव्र शब्दात केली नाराजी व्यक्त