politics : निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात दोन्हीही गटांना वापरता येणार नाही, असा आदेश दिला. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले. त्यानंतर मात्र यावर शिवसेनेकडून तीव्र प्रतिक्रिया माध्यमांसमोर येत आहेत. सोलापूरमधील युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी माध्यमांसमोर शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका केली.
शरद कोळी यांनी हे भाजप आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप यावेळी केला. ते पुढे म्हणाले, ‘या गोष्टीनंतर मात्र आता महाराष्ट्रात शिवसैनिक आक्रमक होतील. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. याला सर्वस्वी शिंदे मिंदे गट आणि भाजप जबाबदार असणार आहेत.’
‘तुमच्यात हिम्मत असेल, दम असेल, तर मध्यवर्ती निवडणुका, एकत्रित सार्वजनिक निवडणुका घेऊन दाखवा, असं ओपन चॅलेंज यावेळी बोलताना शरद कोळींनी शिंदे गट आणि भाजपला दिले. या सर्वांच्या छाताडावर नाचणारा शिवसेना पक्ष आहे,’ असंही ते म्हणाले
‘ पन्नास खोके घेऊन बंडखोरी करणाऱ्या या शिंदे गटाच्या आमदारांचा २०२४ मध्ये सुपडा साफ होणार आहे. २०२४ नंतर यांच्याकडे फक्त रिक्षा चालवण्याचे काम उरेल,’ अशा स्वरूपाची खरमरीत टीका यावेळी शरद कोळीने शिंदे गटावर केली.
मागील काही काळापूर्वी शरद कोळी यांनी दणक्यात शिवसेना प्रवेश केला होता. सोलापूरमध्ये कोळी यांचे धाडस या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. या संघटनेच्या तब्बल ५ हजार शाखा सोलापूर भागामध्ये आहेत, असल्याचा दावा केला जातो.
शरद कोळी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर वारंवार टीकास्त्र सोडले. शिंदे गटात सामील झालेल्या शहाजीबापू पाटील यांच्या समोर आव्हान उभे करण्यासाठी शरद कोळी यांना शिवसेनेने पक्षात घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.
महत्वाच्या बातम्या-
health : मोफत ऑपरेशनच्या नावाखाली वृद्धाचे खरे डोळे काढले अन् बसवली काचेची गोटी; डोळे चोरणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड
Rekha : रेखा आणि अमिताभचा रोमान्स बघून प्रचंड संतापल्या होत्या जया बच्चन; जागच्या जागी घेतला ‘हा’ धाडसी निर्णय
politics : शिवसेना स्थापना झाली तेव्हा तु कोंबडीची पीसं उपटत होता काय? तुझी उंची किती, डोकं केवढं