राज्यात गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत. यात नवाब मलिक, अनिल देशमुख यांचा समावेश आहे. तसंच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांचीही ईडीकडून चौकशी सुरू आहे.
अशातच मंगळवारी राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली. थेट ठाकरे कुटुंबालाच थेट ईडीने घेरले. मनी लॉन्डिरग प्रकरणात मोठी कारवाई करत अंमलबजावणी संचालनालयाने थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
आता ठाकरे सरकारमधील आणखी एक नाव समोर येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी कोर्टात बाजू मांडणारे वकील गुणरत्ने सदावर्ते यांनी आता नंबर दिलीप वळसे पाटील यांचा असल्याचं विधान करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. याबाबतचा त्यांचा व्हिडिओ देखील आता व्हायरल होतं आहे.
मागील बरेच दिवस राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. राज्यसरकारने यावर तोडगा काढवा यासाठी मागणी होत आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. तसेच तर गुणरत्ने सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांची बाजू न्यायालयात मांडत आहेत.
आज मुंबईतील आझाद मैदानात सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला संबोधित केले. विशेष बाब म्हणजे यावेळी आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील उपस्थित होत्या. यावेळी बोलताना ”आता नंबर दिलीप वळसे पाटलांचा”, असं गुणरत्ने सदावर्ते म्हणाले. त्यांच्या या विधानावरून आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे हे वक्तव्य करण्याआधी पत्नी आणि वकील जयश्री पाटील यांनी सदावर्ते यांच्या कानात काहीतरी सांगितलं. त्यानंतर सदावर्ते यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या बद्दल हे विधान केलं. जयश्री पाटील यांनी सदावर्ते यांच्या कानात नेमकं काय सांगितल? याबाबत संभ्रम निर्माण झाला असून त्यांचा हा व्हिडिओ आता व्हायरल होतं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘द काश्मीर फाइल्स’ने बॉलिवूडचा नाश केला; चित्रपट बघितल्यानंतर राम गोपाल वर्मांनी दिली पहिली प्रतिक्रिया
उद्धव ठाकरेंमागे ईडीची पिडा! आणखी सहा घोटाळे बाहेर येणार, सोमय्यांच्या वक्तव्याने खळबळ
त्याला माझ्या मदतीची काही गरज नाही, तो एक आत्मनिर्भर आहे; रस्त्यावर धावणाऱ्या प्रदीपवर महिंद्रांनी दिली प्रतिक्रिया
सेक्स आणि मसाल्यांपासून लांब राहून १२६ वर्षांपासून निरोगी आयुष्य जगत आहेत शिवानंद बाबा